वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमआयडीसी पथकाच्या विशेष पाहणीत आज, १७ मार्चला एका बंद कंपनीत घरगुती गॅस सिलिंडर्सचा मोठा साठा आढळल्याने खळबळ उडाली आहे. वाळूज एमआयडीसीतील सी-८८ सेक्टरमधील इजीस अम्पल्स या बंद कंपनीत संशयास्पद हालचाली दिसून आल्या. अधिकाऱ्यांनी कंपनीत प्रवेश करून तपासणी केली असता, विविध कंपन्यांच्या शेकडो रिकाम्या गॅस टाक्या साठवून ठेवल्याचे दिसले.

औद्योगिक क्षेत्रातील मोकळे भूखंड, बंद कारखाने व प्रत्यक्ष उद्योग सुरू नसलेल्या जागांवर बेकायदा उद्योग तर सुरू नाहीत ना, याची खात्री करण्यासाठी शासनाच्या आदेशाने एमआयडीसी प्रशासनाने विशेष पाहणी मोहीम हाती घेतली आहे. त्यादरम्यान ही धक्कादायक बाब समोर आली आहे. एकीकडे शहर, जिल्ह्यात सध्या घरगुती गॅस सिलिंडर्सची कमतरता जाणवत असताना, एवढा मोठा घरगुती गॅस सिलिंडरचा साठा आढळल्याने नक्की काय उद्देश यामागे आहे, याचा तपास होण्याची गरज आहे.

औद्योगिक प्लॉटवर व्यावसायिक गॅस टाक्यांची साठवणूक करणे नियमबाह्य आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क करून बंदोबस्त मागवला. त्यानंतर सर्व टाक्या दोन ट्रकमध्ये भरून पुढील कारवाईसाठी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या. कारवाईवेळी एमआयडीसीचे क्षेत्रीय व्यवस्थापक अशोक रसाळ, रामकृष्ण गोरे, सुनील सोनवणे, अशोक कळंके, राजू मगरे, फौजदार प्रविण पाथरकर, पोलीस कॉन्स्टेबल  संदीप तागड, वैभव गायकवाड, नितीन इनामे, समाधान पाटील आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. एमआयडीसी प्रशासनाच्या या कारवाईमुळे बंद कारखान्यांचा वापर बेकायदा साठेबाजीसाठी होत असल्याचा संशय निर्माण झाला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लग्नाचे आमिष दाखवून ३० वर्षीय युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार, वाळूज एमआयडीसीतील घटना, युवती साडेपाच महिन्यांची गर्भवती, आता लग्नाला नकार

Latest News

लग्नाचे आमिष दाखवून ३० वर्षीय युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार, वाळूज एमआयडीसीतील घटना, युवती साडेपाच महिन्यांची गर्भवती, आता लग्नाला नकार लग्नाचे आमिष दाखवून ३० वर्षीय युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार, वाळूज एमआयडीसीतील घटना, युवती साडेपाच महिन्यांची गर्भवती, आता लग्नाला नकार
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लग्नाचे आमिष दाखवून ३० वर्षीय युवतीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवून, तिला प्रेग्नंट करून नंतर...
जिल्हा परिषदेत सत्तेसाठी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता, भाजपच्या अंतिम खेळीकडे लागल्या सर्वांच्या नजरा!
प्रा. राजाराम लोंढे खून प्रकरण : रीलस्टार तरुणीचेही प्रा. लोंढेंसोबत २५ लाखांचे व्यवहार!; व्यवहारांचे बाँडवर करारनामेही...
वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!
सिल्लोडच्या सुसाट पिकअप वाहनाने स्कुटीस्वार डॉक्टरांना उडवले, जागीच मृत्यू, पालोदवर शोककळा!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software