जिल्हा परिषदेत सत्तेसाठी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता, भाजपच्या अंतिम खेळीकडे लागल्या सर्वांच्या नजरा!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी आज, १८ मार्चला दुपारी २ वाजता विशेष सभा होत आहे. तत्पूर्वी सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत नामनिर्देशन स्वीकारले जाईल. अध्यक्षपद काबीज करण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाने ठाकरे गटाला सोबत घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आल्याने भाजप सतर्क झाली असून, भाजपची अंतिम खेळी काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिंदे गटाने ३७ सदस्यांचा आकडा जमविल्याचे सांगण्यात येत आहे. असे झाले तर भाजपला गेल्यावेळी प्रमाणे पुन्हा सर्वात जास्त संख्याबळ असतानाही सत्तेपासून वंचित राहावे लागेल. मागील काळातही (२०१७ ते २०२२) भाजपकडे सर्वाधिक सदस्य असताना शिवसेनेने (अविभाजीत) काँग्रेसशी हातमिळवणी करून सत्ता ताब्यात घेतली होती. पाचही वर्षे अध्यक्षपद स्वतःकडे ठेवले होते. आता शिंदे गट ५ वर्षांसाठी अध्यक्षपद स्वतःकडे ठेवून ठाकरे गटाला उपाध्यक्षपद देणार असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा परिषदेत भाजपचे २३, शिंदे गटाचे २१, ठाकरे गटाचे ९, अजित पवार गटाचे ४,  काँग्रेसचा १, शरद पवार गटाचा १ आणि अपक्ष ४ असे एकूण ६३ सदस्य निवडून आलेले आहेत. काँग्रेसच्या एकमेव सदस्याने अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ठाकरे गटाचे २ सदस्य भाजपने फोडले असल्याची चर्चा आहे.

या सदस्यांची माहिती समोर आल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने निवडणुकीसाठी पक्षाने व्हीप जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्हिपला हे सदस्य जुमानतात का, हे पहावे लागेल. भाजपने २६ सदस्यांचा तर शिंदे गटाने ३७ चा आकडा काबीज केल्याचा दावा केला आहे. अपक्षांसह दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य शिंदे गटासोबत आहेत. यात ठाकरे गट आता गेमचेंजर ठरेल. बहुमतासाठी ३२ सदस्य असणे आवश्यक आहेत. केंद्र आणि राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या भाजप आणि शिंदे गटात जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी सुरू असलेली रस्सीखेच पाहता, वरिष्ठ पातळीवर याचा काय परिणाम होणार, यावरही आता चर्चा होताना दिसत आहे.

अध्यक्ष ‘आधी कोण’वरून फिस्कटले! ‌
भाजप-शिंदे गटात अडीच-अडीच वर्षे अध्यक्षपद वाटून घेण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र आधी अध्यक्ष कोणत्या पक्षाचा होणार, यावरून दोन्ही पक्षांत मतभेद निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. याची परिणिती आता थेट एकमेकांविरुद्ध निवडून लढण्यात झाली आहे. तरीही ऐनवेळी काहीही घडू शकते. दुपारी २ ला सभा सुरू होऊन प्रथम नामनिर्देश पत्रांची छाननी होईल. त्यानंतर नामनिर्देशन पत्र माघारीसाठी वेळ दिला जाईल. त्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी (मराठी वर्णाक्षर क्रमानुसार) तयार करण्यात येईल. त्यानंतर प्रथम अध्यक्षपदासाठी व नंतर उपाध्यक्षपदासाठी एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर हात वर करून मतदान घेण्यात येईल. हात वर करून मतदान करणाऱ्या सदस्यांची स्वाक्षरी घेऊन नोंद घेण्यात येईल. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात येणार आहे.

ठाकरे गटाच्या गटनेतेपदी मनोज पेरे
जिल्हा परिषद सभागृहात ठाकरे गटाच्या गटनेतेपदी मनोज नंदकिशोर पेरे यांची निवड जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मंगळवारी केली. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पक्षाच्या सदस्यांना पेरे हे व्हीप (पक्षादेश) जारी करणार आहेत. याचे पालन बंधनकारक असेल.

विभागीय आयुक्तांचे निवासस्थान ते चांदणे चौक रस्ता ठेवला बंद
निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा परिषद सदस्यांसह कार्यकर्ते, नागरिकांची मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे विभागीय आयुक्तांचे निवासस्थान ते चांदणे चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. सकाळी ८ पासून हा मार्ग बंद केला असून, निवडणूक प्रक्रिया पार पडेपर्यंत मार्ग बंद राहणार असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक अमोल देवकर यांनी केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

उच्चशिक्षित तरुणांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये थाटला ड्रग्जचा कारखाना!; ड्रग्जविरोधी पथकाने केला पर्दाफाश

Latest News

उच्चशिक्षित तरुणांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये थाटला ड्रग्जचा कारखाना!; ड्रग्जविरोधी पथकाने केला पर्दाफाश उच्चशिक्षित तरुणांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये थाटला ड्रग्जचा कारखाना!; ड्रग्जविरोधी पथकाने केला पर्दाफाश
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रग्ज बाजार इतका फोफावला आहे, की एवढ्या कारवाया होऊनही हा बाजार संपुष्टात...
लग्नाचे आमिष दाखवून ३० वर्षीय युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार, वाळूज एमआयडीसीतील घटना, युवती साडेपाच महिन्यांची गर्भवती, आता लग्नाला नकार
जिल्हा परिषदेत सत्तेसाठी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता, भाजपच्या अंतिम खेळीकडे लागल्या सर्वांच्या नजरा!
प्रा. राजाराम लोंढे खून प्रकरण : रीलस्टार तरुणीचेही प्रा. लोंढेंसोबत २५ लाखांचे व्यवहार!; व्यवहारांचे बाँडवर करारनामेही...
वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software