खडकेश्वरमधील ती काळरात्र... २ भंगारवेचकांच्या अंगावरून चारचाकी गेली... एकाचा मृत्यू, दुसरा जखमी; जगण्यासाठीची धडपड थांबली...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मरणाने केली सुटका... जगण्याचे छळले होते... प्रसिद्ध कवींच्या या ओळी खडकेश्वर येथील मध्यरात्री घडलेल्या अपघाताने पुन्हा जणू सत्यात उतरल्या. निवांत झोपलेल्या भंगारवेचकाच्या अंगावरून चारचाकी गेली. नशिबी आलेली दैन्यावस्था, त्यातून जगण्यासाठी सुरू असलेली धडपड थांबली अन्‌ ती रात्र त्याच्यासाठी काळरात्र ठरली... तो कोण होता, कुठला होता, हे समोर आलेलं नाही, एव्हाना येईल की नाही, हेही सध्या सांगता येत नाही. मात्र पोलिसांनी हलगर्जीपणाने गाडी अंगावरून नेत त्याच्या मृत्‍यूस कारणीभूत ठरलेल्या गाडीचालकाविरुद्ध सोमवारी (१६ मार्च) गुन्हा दाखल केला आहे.

नवनाथ पांडुरंग कापते (वय ५०, रा. हतनूर, ता. कन्नड) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते मोलमजुरीचे काम करतात. तीन वर्षांपासून भोईवाडा येथे राहतात. भंगार गोळा करताना तीन वर्षांपूर्वी त्यांची ओळख छायना रमेश याच्याशी झाली. तो कुठे राहतो किंवा त्याचे पूर्ण नवनाथ यांना माहीत नाही. ६ मार्च रोजी रात्री १० च्या सुमारास नवनाथ व छायना यांनी भोईवाडा येथील देशी दारूच्या दुकानातून दारू घेतली. दुकानाजवळ काही दारू पिली आणि खडकेश्वर येथील राजस्थानी होस्टेलकडे पायी येताना मराठा हॉटेल, मिलकॉनर भोईवाडा येथून जेवण घेऊन पायी चालत रात्री साडेदहाच्या सुमारास दोघे राजस्थानी मुलींच्या होस्टेलच्या  कंपाउंड वॉलजवळ परत त्यांनी एक देशी दारूची सोबत आणलेली बाटली अर्धी अर्धी पिली.

नंतर जेवण केले. त्यानंतर दोघेही तेथेच जागेवर कचरा वेचण्याच्या गोण्यासह झोपले. झोपण्याअगोदर तेथे अगोदरच एक चारचाकी गाडी उभी होती. त्या गाडीमागे दोघे झोपले होते. ते झोपेत असतानाच गाडीचालकाने रिव्हर्स घेऊन त्यांच्या पायावरून गाडी घालून नवनाथ व छायना यांना जबर दुखापत केली. नवनाथ यांनी उठून पाहिले असता गाडीवाला तिथून निघून गेला होता. त्यानंतर छायनाकडे पाहिले तेव्हा त्याच्या दोन्ही पायावरून गाडी गेल्याने त्याला उठता येत नव्हते. तो जागेवरच पडून रडत होता.

रात्रीचा अंधार असल्यामुळे त्यांना कोणी पाहिलेही नाही. ७ मार्चला सकाळी साडेसातच्या सुमारास नवनाथ हा जवळच्या टपरीवर गेला व त्यानंतर तिथल्या कुणीतरी रुग्णवाहिकेला कॉल केला. रुग्णवाहिकेतून छायनाला घाटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र छायनाचा उपचारादरम्यान ८ मार्चला रात्री ९ च्या सुमारास मृत्यू झाला. नवनाथवर उपचार करण्यात आले. दोघांवरून कोणते वाहन गेले, हे नवनाथला सांगता येत नाही. मात्र त्याच्या जबाबावरून पोलिसांनी अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष खरात करत आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस वापरल्यास आता हॉटेलचालकांवर थेट गुन्हे दाखल!; बु‌ढीलाईनमध्ये मोठी कारवाई, वडे-भजे तळत असतानाच धडके पथक...

Latest News

घरगुती गॅस वापरल्यास आता हॉटेलचालकांवर थेट गुन्हे दाखल!; बु‌ढीलाईनमध्ये मोठी कारवाई, वडे-भजे तळत असतानाच धडके पथक... घरगुती गॅस वापरल्यास आता हॉटेलचालकांवर थेट गुन्हे दाखल!; बु‌ढीलाईनमध्ये मोठी कारवाई, वडे-भजे तळत असतानाच धडके पथक...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : घरगुती गॅसवर वडे, भजे तळणाऱ्या हॉटेलचालकाविरुद्ध बुढीलाईनमध्ये रविवारी (१५ मार्च) दुपारी १२ ला कारवाई...
आधी कोण?; अध्यक्षपदासाठी भाजप, शिंदे गटात रंगली वर्चस्वाची लढाई, ठाकरे गटाच्या आशा पल्लवीत... उद्या काय होणार?
खडकेश्वरमधील ती काळरात्र... २ भंगारवेचकांच्या अंगावरून चारचाकी गेली... एकाचा मृत्यू, दुसरा जखमी; जगण्यासाठीची धडपड थांबली...
ट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये टवाळखोराचा राडा, चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवाशाला लुटले!; सिडको बसस्थानकाजवळील घटना
सिल्लोडमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला एसटी बसने उडवले, तरुणाचा जागीच मृत्यू
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software