लग्नाचे आमिष दाखवून ३० वर्षीय युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार, वाळूज एमआयडीसीतील घटना, युवती साडेपाच महिन्यांची गर्भवती, आता लग्नाला नकार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लग्नाचे आमिष दाखवून ३० वर्षीय युवतीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवून, तिला प्रेग्नंट करून नंतर लग्नासाठी नकार देणाऱ्या युवकाला वाळूज एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रेहान मोहम्मद शेख (रा. हनुमाननगर, रांजणगाव शेणपुंजी) असे संशयित युवकाचे नाव आहे. युवतीच्या तक्रारीनुसार रेहानने तिला प्रेम असल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखवले. तिचा विश्वास संपादन करून वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. काही काळ दोघे एकत्र राहत होते. यातून युवती सध्या साडेपाच महिन्यांची गर्भवती आहे.  तिने रेहानकडे लग्नाचा तगादा लावला असता, त्याने लग्नास नकार देत गर्भपात केला नाही तर जीवे मारेन, अशी धमकी दिली. युवतीने मूळ गावी अमरावतीला जाऊन तिथे पोलिसांत रेहानविरुद्ध तक्रार दिली. घटना वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत घडलेली असल्याने, वाळूज एमआयडीसी पोलिसांकडे गुन्हा वर्ग झाला. सहायक पोलीस आयुक्त डॉ. भागीरथी पवार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी युवतीकडून घटनाक्रमक जाणून घेतला. रेहानला ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

उच्चशिक्षित तरुणांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये थाटला ड्रग्जचा कारखाना!; ड्रग्जविरोधी पथकाने केला पर्दाफाश

Latest News

उच्चशिक्षित तरुणांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये थाटला ड्रग्जचा कारखाना!; ड्रग्जविरोधी पथकाने केला पर्दाफाश उच्चशिक्षित तरुणांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये थाटला ड्रग्जचा कारखाना!; ड्रग्जविरोधी पथकाने केला पर्दाफाश
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रग्ज बाजार इतका फोफावला आहे, की एवढ्या कारवाया होऊनही हा बाजार संपुष्टात...
लग्नाचे आमिष दाखवून ३० वर्षीय युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार, वाळूज एमआयडीसीतील घटना, युवती साडेपाच महिन्यांची गर्भवती, आता लग्नाला नकार
जिल्हा परिषदेत सत्तेसाठी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता, भाजपच्या अंतिम खेळीकडे लागल्या सर्वांच्या नजरा!
प्रा. राजाराम लोंढे खून प्रकरण : रीलस्टार तरुणीचेही प्रा. लोंढेंसोबत २५ लाखांचे व्यवहार!; व्यवहारांचे बाँडवर करारनामेही...
वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software