सिल्लोडमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला एसटी बसने उडवले, तरुणाचा जागीच मृत्यू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रस्ता ओलांडताना एसटी बसने जोरदार धडक दिल्याने २८ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सिल्लोड शहरातील छत्रपती संभाजीनगर नाक्यावर सोमवारी (१६ मार्च) दुपारी २ च्या सुमारास घडली. अजिनाथ धोंडीराम फुले (वय २८, रा. पिंपळगाव पेठ, ता. सिल्लोड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अजिनाथ दुचाकीने रस्ता ओलांडत असतानाच मलकापूर ते पुणे एसटी बसने उडवले. नागरिकांनी धाव घेऊन अजिनाथला तातडीने सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासून अजिनाथला मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी ७ वाजता त्याच्या पार्थिवावर पिंपळगाव पेठ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अजिनाथपश्चात आई, वडील, पत्नी, चार वर्षांची मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे. घटनेची नोंद सिल्लोड शहर पोलिसांनी घेतली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस वापरल्यास आता हॉटेलचालकांवर थेट गुन्हे दाखल!; बु‌ढीलाईनमध्ये मोठी कारवाई, वडे-भजे तळत असतानाच धडके पथक...

Latest News

घरगुती गॅस वापरल्यास आता हॉटेलचालकांवर थेट गुन्हे दाखल!; बु‌ढीलाईनमध्ये मोठी कारवाई, वडे-भजे तळत असतानाच धडके पथक... घरगुती गॅस वापरल्यास आता हॉटेलचालकांवर थेट गुन्हे दाखल!; बु‌ढीलाईनमध्ये मोठी कारवाई, वडे-भजे तळत असतानाच धडके पथक...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : घरगुती गॅसवर वडे, भजे तळणाऱ्या हॉटेलचालकाविरुद्ध बुढीलाईनमध्ये रविवारी (१५ मार्च) दुपारी १२ ला कारवाई...
आधी कोण?; अध्यक्षपदासाठी भाजप, शिंदे गटात रंगली वर्चस्वाची लढाई, ठाकरे गटाच्या आशा पल्लवीत... उद्या काय होणार?
खडकेश्वरमधील ती काळरात्र... २ भंगारवेचकांच्या अंगावरून चारचाकी गेली... एकाचा मृत्यू, दुसरा जखमी; जगण्यासाठीची धडपड थांबली...
ट्रॅव्हल्स ऑफीसमध्ये टवाळखोराचा राडा, चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवाशाला लुटले!; सिडको बसस्थानकाजवळील घटना
सिल्लोडमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला एसटी बसने उडवले, तरुणाचा जागीच मृत्यू
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software