कांचनवाडीत तलवारीने दहशत माजवणाऱ्या युवकावर पोलिसांनी घातली झडप!, व्हॉट्‌स ॲप चॅटिंगमध्ये झाला धक्कादायक उलगडा...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कांचनवाडीतील कश्मिरनगरात हातात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या युवकाच्या मुसक्या सातारा पोलिसांनी आवळल्या. त्याच्याकडील चौकशीत त्याच्याकडे गांजाचा साठा असल्याचेही समोर आले. पोलिसांनी सव्वा किलो गांजा जप्त केला. ही कारवाई सोमवारी (१६ मार्च) करण्यात आली.

सोनूसिंग दीपकसिंग भोंड (वय ३०, रा. कांचनवाडी स्मशानभूमी, कश्मिरनगर) असे पकडण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले, पोलीस अंमलदार सुरेश काळे यांनी दिलेल्या तक्रारींवरून दोन वेगवेगळे गुन्हे सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. सातारा पोलिसांचे पथक फरारी असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेत होते. कांचनवाडीतील कश्मिरनगरात सोनूसिंग हातात धारदार तलवार घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसह तिथे जाऊन सोनूसिंगला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक तलवार व मोबाइल मिळून आला.

पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडील मोबाइलमधील व्हॉट्स अॅप चॅटींगमध्ये गांजा खरेदी केल्याचे समोर आले. त्याने गांजा त्याच्या घरामागील बकऱ्यांच्या गोठ्यात ठेवलेला असल्याचे सांगितले. पोलिसांनी तिथे जाऊन १ किलो २०९ ग्रॅम गांजा (किंमत २४ हजार १८० रुपये) जप्त केला. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त मनिष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक शैलेश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले, दिलीप बचाटे, नंदकुमार भंडारे, पोलीस अंमलदार दिगंबर राठोड, सुनिल बेलकर, सचिन काळे, सुरेश काळे, कल्याण निकम, विशाखा तुपे, गिता ढाकणे यांनी पार पाडली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!

Latest News

वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ! वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमआयडीसी पथकाच्या विशेष पाहणीत आज, १७ मार्चला एका बंद कंपनीत घरगुती गॅस सिलिंडर्सचा मोठा...
सिल्लोडच्या सुसाट पिकअप वाहनाने स्कुटीस्वार डॉक्टरांना उडवले, जागीच मृत्यू, पालोदवर शोककळा!!
कांचनवाडीत तलवारीने दहशत माजवणाऱ्या युवकावर पोलिसांनी घातली झडप!, व्हॉट्‌स ॲप चॅटिंगमध्ये झाला धक्कादायक उलगडा...
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय : स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन सुविधा बंधनकारक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आदेश
पैठण शहरातील १९ वर्षीय युवती, २५ वर्षीय विवाहिता बेपत्ता!; माहिती कळविण्याचे आवाहन
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software