छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय : स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन सुविधा बंधनकारक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आदेश

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये अंतर्गत सुरक्षा यंत्रणा आवश्यक आहे. त्यात सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणा व पॅनिक बटन या सारख्या सुविधा अनिवार्य कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत सोमवारी (१६ मार्च) दिले.

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, सहायक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा घार्गे-वालावलकर, सुभाष भुजंग, मोटार वाहन निरीक्षक संदीप शेलार आदी या वेळी उपस्थित होते. बैठकीत निर्देश देण्यात आले की, जिल्ह्यात शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची सुरक्षा व्यवस्था अत्याधुनिक करण्यावर भर देण्यात यावा. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणा, पॅनिक बटण तसेच महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी.

याप्रमाणे अंमलबजावणी न केल्यास संबंधित वाहन मालकावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णयही घेण्यात आला. तसेच सार्वजनिक वाहतुकीत शिस्त व विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील ई-रिक्षा चालकांना वैध ड्रायव्हिंग लायसन्स, चालक बॅज, चारित्र्य पडताळणी व अन्य आवश्यक कागदपत्रे बंधनकारक करण्यात आली. अवैध वाळू, गौण खनिज वाहतुकीवर कठोर कारवाई करण्यात यावी. जिल्ह्यातील वाहतूक व रस्ते सुरक्षा सुरळीत राखण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी या वेळी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!

Latest News

वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ! वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमआयडीसी पथकाच्या विशेष पाहणीत आज, १७ मार्चला एका बंद कंपनीत घरगुती गॅस सिलिंडर्सचा मोठा...
सिल्लोडच्या सुसाट पिकअप वाहनाने स्कुटीस्वार डॉक्टरांना उडवले, जागीच मृत्यू, पालोदवर शोककळा!!
कांचनवाडीत तलवारीने दहशत माजवणाऱ्या युवकावर पोलिसांनी घातली झडप!, व्हॉट्‌स ॲप चॅटिंगमध्ये झाला धक्कादायक उलगडा...
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय : स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन सुविधा बंधनकारक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आदेश
पैठण शहरातील १९ वर्षीय युवती, २५ वर्षीय विवाहिता बेपत्ता!; माहिती कळविण्याचे आवाहन
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software