मनोवृत्ती बदलण्याची ताकद फक्‍त अध्यात्मातच : महंत रामगिरी महाराज; वैजापूरमध्ये १४ गावे मिळून घेताहेत अखंड हरिनाम सप्ताह

On

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : जो भक्त भगवंताची भक्ती करतो, त्याला तो प्राप्त होतो. सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनुष्यात बदल व्हायचा असेल तर त्याची मनोवृत्ती बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदलण्याची ताकद फक्त अध्यात्मामध्ये व अखंड हरिनाम सप्ताहातच आहे, असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.

शनिदेवगाव (ता. वैजापूर) येथे तालुक्यातील १४ गावांनी मिळून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले असून, सप्ताहातील चौथ्या दिवशी शनिवारी (२ ऑगस्ट) भगवद्‌गीतेच्या अकराव्या अध्यायातील श्लोकावर  महंत रामगिरी महाराज यांचे प्रवचन झाले. या वेळी पंचगंगा उद्योग समूहाचे प्रभाकर शिंदे, डॉ. दिनेश परदेशी, अविनाश गलांडे, कृष्णा पाटील डोणगावकर, अनुराधा आदिक, डॉ. राजीव डोंगरे, नवनाथ महाराज मस्के, बाळासाहेब महाराज रंजाळे, उत्तम महाराज गाढे, अमोल महाराज गाढे, रामभाऊ महाराज, रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरी महाराज, शिवगिरी आश्रमाचे संदीपान महाराज, योगानंद महाराज, सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज, दत्ता पाटील खपके यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

इन्‍स्‍टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाने १५ वर्षीय मुलगी कारमधून पळवली, हॉटेलमध्ये मुलगी ओरडल्याने परत आणून सोडताना तिच्या नातेवाइकांनी घेतले ताब्‍यात! नारेगाव ते नगर नाका, व्हाया खुलताबाद, अहिल्यानगर काय घडलं...

Latest News

इन्‍स्‍टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाने १५ वर्षीय मुलगी कारमधून पळवली, हॉटेलमध्ये मुलगी ओरडल्याने परत आणून सोडताना तिच्या नातेवाइकांनी घेतले ताब्‍यात! नारेगाव ते नगर नाका, व्हाया खुलताबाद, अहिल्यानगर काय घडलं... इन्‍स्‍टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाने १५ वर्षीय मुलगी कारमधून पळवली, हॉटेलमध्ये मुलगी ओरडल्याने परत आणून सोडताना तिच्या नातेवाइकांनी घेतले ताब्‍यात! नारेगाव ते नगर नाका, व्हाया खुलताबाद, अहिल्यानगर काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नारेगाव येथून घराजवळून १५ वर्षीय मुलीचे प्रियकराने कारमधून अपहरण केले. तिला खुलताबाद, अहिल्यानगरला नेले. तिथे...
हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे...
कृषी खात्‍यातील वरिष्ठ लिपिकाची गोदापात्रात उडी घेऊन आत्‍महत्‍या, चार महिन्यांपूर्वी झाले होते लग्‍न, गंगापूर तालुक्‍यातील धक्कादायक घटना
लाचखोर तलाठी अक्षय बिनीवाले, कोतवाल सोमनाथ कोल्हे ACB च्या जाळ्यात!, पैठण तहसील कार्यालयात कारवाई
हे असे आंदोलन योग्य आहे? : वसतिगृहात आक्षेपार्ह वस्तू सापडल्या, त्‍यामुळे रात्रीची तपासणी, काही विद्यार्थी रात्री एक-दोनला येतात, त्‍यामुळे १० नंतर नो एंट्री!; विधी विद्यापीठ झाले सक्‍त, पण रूचली नाही ‘शिस्त’!!'; विद्यार्थ्यांचे आंदोलन
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software