चिकलठाण्यातील वीर गुर्जर फुड्स कंपनीत चोर शिरतात तेव्हा...

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाण्याजवळील बीड बायपासवरील वीर गुर्जर फुड्स प्रा.लि. कंपनी शुक्रवारी (१ ऑगस्ट) पहाटे ३ चोर शिरले. त्‍यांनी कॅन्डी मेकिंग मशीनच्या ५० हजारांच्या क्‍वाइल चोरून नेल्या. सिडको एमआयडीसी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रतन बाळूलाल गुर्जर (वय ३०, रा. टाऊन सेंटर एन ५ सिडको, कॅनॉट परिसर छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्‍यांची वीर गुर्जर फुड्स प्रा.लि. कंपनी जुना बीड बायपास चिकलठाणा येथे आहे. गुरुवारी (३१ जुलै) सायंकाळी सहाच्या सुमारास कंपनीचे मॅनेजर विश्वास शरद चंद्रात्रे यांनी कंपनीचे गेट बंद करून घरी गेले होते. शुक्रवारी (१ ऑगस्ट) सकाळी साडेसातला गुर्जर हे कंपनीत आले समोरच्या कंपनीत काम करणाऱ्या व्यक्‍तीने सांगितले, की पहाटे चारला तीन व्यक्‍ती तुमच्या कंपनीत घुसले होते.

त्यांनी कंपनीतील माल आणून रोडवर ठेवला, तेव्हा आम्ही त्यांना कोण आहे, असा आवाज दिला असता ते तिघे चोरलेला माल रोडवरच ठेवून पळून गेले. तुमचा मोबाईल नंबर आमच्याकडे नसल्याने आम्ही तुम्हाला फोन केला नाही. त्यावरून गुर्जर यांनी कंपनीत जाऊन पाहणी केली असता कंपनीच्या समोरच्या बाजूच्या खिडकीचे गज कापलेले दिसले. कंपनीतील सामानाची पाहणी केली असता कॅन्डी मेकिंग मशीनचे तांब्याचे छोटे छोटे पार्ट्‌स तोडून काढून नेल्याचे दिसले. कंपनीसमोरच्या रोडवर दोन कॅन्डी मशीनच्या क्वाइल दिसून आल्या. चोरट्यांनी एकूण ५० हजार रुपयांचे साहित्‍य चोरून नेले. अधिक तपास पोलीस अंमलदार संतोष सोनवणे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

इन्‍स्‍टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाने १५ वर्षीय मुलगी कारमधून पळवली, हॉटेलमध्ये मुलगी ओरडल्याने परत आणून सोडताना तिच्या नातेवाइकांनी घेतले ताब्‍यात! नारेगाव ते नगर नाका, व्हाया खुलताबाद, अहिल्यानगर काय घडलं...

Latest News

इन्‍स्‍टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाने १५ वर्षीय मुलगी कारमधून पळवली, हॉटेलमध्ये मुलगी ओरडल्याने परत आणून सोडताना तिच्या नातेवाइकांनी घेतले ताब्‍यात! नारेगाव ते नगर नाका, व्हाया खुलताबाद, अहिल्यानगर काय घडलं... इन्‍स्‍टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाने १५ वर्षीय मुलगी कारमधून पळवली, हॉटेलमध्ये मुलगी ओरडल्याने परत आणून सोडताना तिच्या नातेवाइकांनी घेतले ताब्‍यात! नारेगाव ते नगर नाका, व्हाया खुलताबाद, अहिल्यानगर काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नारेगाव येथून घराजवळून १५ वर्षीय मुलीचे प्रियकराने कारमधून अपहरण केले. तिला खुलताबाद, अहिल्यानगरला नेले. तिथे...
हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे...
कृषी खात्‍यातील वरिष्ठ लिपिकाची गोदापात्रात उडी घेऊन आत्‍महत्‍या, चार महिन्यांपूर्वी झाले होते लग्‍न, गंगापूर तालुक्‍यातील धक्कादायक घटना
लाचखोर तलाठी अक्षय बिनीवाले, कोतवाल सोमनाथ कोल्हे ACB च्या जाळ्यात!, पैठण तहसील कार्यालयात कारवाई
हे असे आंदोलन योग्य आहे? : वसतिगृहात आक्षेपार्ह वस्तू सापडल्या, त्‍यामुळे रात्रीची तपासणी, काही विद्यार्थी रात्री एक-दोनला येतात, त्‍यामुळे १० नंतर नो एंट्री!; विधी विद्यापीठ झाले सक्‍त, पण रूचली नाही ‘शिस्त’!!'; विद्यार्थ्यांचे आंदोलन
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software