पडेगावच्या कल्पनाची अफगाणी प्रियकरावर उधळपट्टी!; प्रकरण तोतयेगिरी, प्रेमसंबंधापर्यंतच मर्यादित की आणखी काही?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तोतया आयएएस अधिकारी कल्पना त्र्यंबकराव भागवत (वय ४५, रा. चिनारगार्डन, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) व तिचा अफगाणी प्रियकर मोहम्मद अशरफ गिल (वय २४, ह. मु. जंगपुरा, नवी दिल्ली) व केंद्रीय गृहमंत्र्यांच्या ओएसडींच्या नावाचा वापर करणारा तोतया अधिकारी डिम्पी देवेंद्रकुमार हरजाई (वय ३०, रा. पालम, दिल्ली) यांची सध्या पोलीस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे. कल्पना आणि अशरफमध्ये वर्षभरात साडेपाच लाख रुपयांचा व्यवहार झाला. पैकी हे पैसे कल्पनानेच त्याला दिले. त्याने तिला पैसे दिल्याचे आतापर्यंत समोर आलेले नाही. प्रेमात अंध झालेल्या कल्पनाने त्याच्यावर उधळपट्टी केली, असे दिसून येत असले तरी तिच्याकडे एवढे पैसे कुठून आले, असा प्रश्न कायम आहे.

वर्षभरापासून कल्पना आणि अशरफचे केवळ प्रेमसंबंधच होते, की त्यांच्या प्रेमसंबंधाचा प्रवास देशाला धोका निर्माण होईल इथंपर्यंत गेला, याचा सखोल तपास सुरू आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रवचन सोहळ्यात ओळख झालेल्या डिम्पीसोबत मिळून कल्पनाने कोणता कट रचला होता, हेही अद्याप समोर आलेले नाही. तूर्त दोघे स्वतः आयएएस सांगून, मोठमोठ्या लोकांच्या ओळखी सांगून अनेकांना गंडवत असल्याचा किंवा त्यांची कामे करून देत त्या बदल्यात मोठी रक्कम प्राप्त करत असल्याचा संशय आहे. सहा महिन्यांपासून कल्पना, तिची आई जालना रोडवरील फाइव्ह स्टार हॉटेल ॲम्बेसेडरमध्ये राहत होते. हॉटेलचे जवळपास साडेसहा लाख रुपये बिलही त्यांनी भरले. याचदरम्यान महिनाभर रेल्वेस्थानकावरील एमटीडीसीमध्येही त्यांच्या दोन खोल्या बुक होत्या. दरम्यान, पोलिसांनी कल्पनाच्या आईचा जबाबही नोंदवला असून, ती सध्या पडेगावच्या मूळ घरी राहायला गेली आहे. अशरफ अफगाणी नागरिक असल्याने त्याच्या अटकेची माहिती अफगाणिस्तानच्या दुतावासाला देण्यात आली आहे. अशरफ सध्या भोळेपणाचा आव आणत आहे. कल्पना आणि डिम्पी दोघेही तोतया अधिकारी म्हणून वावरत होते. त्यांच्याकडून अशरफला काय साध्य करायचे होते, भावाला भारतात आणण्याचा त्याचा उद्देश काय होता, तो आणखी कुणाच्या संपर्कात होता, याची कसून चौकशी पोलीस करत आहेत.

कल्पना प्रेमात वाहिली, की आणखी काही?
कल्पना आणि अशरफची लव्हस्टोरी या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असली तरी त्यांचे उद्देश तिथपर्यंतच मर्यादित नव्हते, हेही एव्हाना समोर आले आहे. ते एकमेकांच्या संपर्कात आल्यापासून सुमारे अडीच लाख व तीन लाख रुपये कल्पनाने त्याला दिले. त्यातील ७५ हजार रुपये कल्पनाच्या सांगण्यावरून अशरफने तिसऱ्या व्यक्तीला पाठवले. ही तिसरी व्यक्ती कोण, याची चौकशी केली जात आहे. विशेष म्हणजे कल्पना प्रेमात इतकी वाहवत गेली होती, की अशरफचे तीन महिन्यांचे घरभाडेही कल्पनाने दिल्याचे समोर आले आहे.

विद्यापीठातून घेतली होती स्वेच्छानिवृत्ती...
सुरुवातीला विद्यापीठाच्या सेवेतून कल्पनाला बडतर्फ करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता विद्यापीठाने पोलिसांना कळवले आहे, की २०१३ मध्ये कल्पना सरळ सेवाभरतीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भरती झाली होती. मात्र कल्पनाने अचानक स्वेच्छानिवृत्ती मागितली. सुरुवातीला विद्यापीठाने तिचा राजीनामा मंजूर केला नव्हता. मात्र, त्यानंतर ती गैरहजर राहिली. त्यामुळे २०२१ मध्ये तिचा राजीनामा मंजूर करण्यात आला. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...
खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
'वाईट कमेंट वाचून त्यांना फटकारावेसे वाटत होते...; अभिनेत्री नेहा धुपियाची विशेष मुलाखत
Business News : भाजी विक्रेत्याने जिंकली ११ कोटींची पंजाब राज्य लॉटरी, त्याला किती उत्पन्न कर भरावा लागेल?
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software