- News
- सिटी क्राईम
- मुलीच्या प्रेमाला विरोध, प्रियकराचे कारमधून सिनेस्टाइल अपहरण करत बेदम मारहाण, मुलीच्या आईचे कृत्य, स...
मुलीच्या प्रेमाला विरोध, प्रियकराचे कारमधून सिनेस्टाइल अपहरण करत बेदम मारहाण, मुलीच्या आईचे कृत्य, सिडको चौकातील थरारपट
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुलीच्या प्रेमाला विरोध असलेल्या तिच्या आईनेच साथीदारांसोबत मिळून मुलीच्या प्रियकराचे कारमधून फिल्मीस्टाइल अपहरण करत साथीदारांकरवी त्याला बेदम मारहाण केली. ही धक्कादायक घटना सिडको चौकात शनिवारी (१३ डिसेंबर) दुपारी चारला घडली. जखमी तरुणावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वर्षभरापूर्वी विशाल आणि तरुणी दोघेही घरातून पळून गेले होते. तेव्हा सुरेश नरवडे यांनी दोघांनाही पोलीस ठाण्यात हजर केले होते. पोलिसांनी दोघांनाही समजावून सांगत तरुणीला तिच्या आईच्या ताब्यात दिले होते. अलीकडच्या काळात मुलीचे लग्न ठरल्याने काही गडबड होऊ नये म्हणून विशालचे अपहरण करून बेदम मारहाण केल्याचा संशय आहे. विशालने पोलिसांना सांगितले, की कारमधून त्याला सातारा परिसरात नेले. आणखी १० ते १२ जणांना बोलावून घेतले आणि त्या सर्वांनी मिळून बेदम मारहाण मारहाण केली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
महाशिवरात्री कधी आहे? शिवपूजेचा शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत जाणून घ्या...
By City News Desk
वाळूज एमआयडीसीतील हॉटेलमध्ये युवकाच्या आत्महत्येने खळबळ
By City News Desk
दानपेटीत चुकून वस्तू पडल्यास विसरा; परत मिळणार नसल्याचा तुळजाभवानी संस्थानचा अजब फतवा!; भाविकांत संताप
By Bhalchandra Pimpalwadkar
Latest News
22 Jan 2026 08:18:53
रोहित शेट्टीच्या गोलमाल मालिकेतील भाग ४ (गोलमाल अगेन) मधील एक दृश्य खूप प्रसिद्ध आहे. या दृश्यात चित्रपटात वसुली भाईची भूमिका...

