निसर्गोपचार केंद्रचालक वैद्याला सुसाट कारने उडवले, गंभीर जखमी, वाळूजवळील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूजजवळील दहेगाव येथील निसर्ग उपचार केंद्राचे चालक कल्याण बन्सी जाधव (वय ५०, रा. दहेगाव ता. गंगापूर) यांना सुसाट कारने उडवून गंभीर जखमी केले. ही घटना दहेगाव फाट्यावर शनिवारी (२७ नोव्‍हेंबर) दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली. वाळूज पोलिसांनी सोमवारी (१ डिसेंबर) कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वैद्य कल्याण जाधव यांच्यावर लिंबेजळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जाधव यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी त्यांचा मुलगा अजय कल्याण जाधव याच्या नावावर हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (MH 20 GT 7893) घेतलेली आहे. दोघेही ही मोटारसायकल वापरतात. २७ नोव्‍हेंबरला दुपारी पाऊणेतीनच्या सुमारास कल्याण हे दहेगाव येथून घरी नरसापूर रोडकडे मोटारसायकलीने निघाले. दहेगाव फाट्यावरून छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर महामार्ग ओलांडत असताना छत्रपती संभाजीनगरकडून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या कारने त्यांना उडवले. यात त्यांच्या डावा पाय आणि छातीला मार लागला. उपचारादरम्यान त्यांना डॉक्टरांनी सांगितले की, त्यांचे उजव्या बाजूकडील खांद्याचे हाड फ्रॅक्चर झाले असून छातीच्या दोन फासळ्यादेखील फ्रॅक्चर झाल्या आहेत. धडक देणाऱ्या इर्टिका कारचा नंबर MH 12 NU 7532 असल्याचे त्यांना एका तरुणाकडून कळाले. त्यावरून त्यांनी वाळूज पोलीस ठाण्यात कारचालकाविरुद्ध तक्रार दिली. अधिक तपास कारभारी देवरे करत आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 

Latest News

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना  पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...
शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना
कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software