मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मिल कॉर्नर सिग्नलवरील हिट ॲन्ड रनप्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी मंगळवारी (१६ डिसेंबर) कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारने हॉटेल मॅनेजर असलेल्या दुचाकीस्वाराला उडवून गंभीर जखमी केले होते.

तेजराव सोमाजी वानखेडे (वय ६२, रा. श्रावस्ती कॉलणी भीमनगर भावसिंगपुरा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते लक्ष्मीनारायण हॉटेलचे मॅनेजर आहेत. २५ नोव्‍हेंबरला रात्री ११ च्या सुमारास ते हिरोहोंडा मोटारसायकलीने (MH 20 AE 1543) ड्युटी संपवून घरी जात होते. मिल कॉर्नर सिग्नलवर एका सुसाट कारने ज्युबली पार्कच्या दिशेने येऊन त्यांना धडक दिली. कारचे चाक तेजराव यांच्या उजव्या पायावरून गेले. त्यामुळे पाय फ्रॅक्चर झाला. लोकांनी मदतीला धावून त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले.

कारचालकाने मदतीला न थांबता कारसह पळून गेला. एका मुलाने तेजराव यांना कारचा नंबर सांगितला. MH12 JC 1206  असे  अपघात घडविणाऱ्या कारचा नंबर असून, वॅगनर मारोती कार असल्याचे तेजराव यांनी तक्रारीत म्हटले आहे. उपचार घेऊन बरे झाल्यानंतर तेजराव यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात कारचालकाविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारचालकाचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार अर्शद इकबाल करत आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...

Latest News

दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले... दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर येथे सोमवारी (२ मार्च) सायंकाळी होळी पूजन झाले. त्यानंतर...
प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार
छत्रपती संभाजीनगरजवळ बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन?; उत्खननाची खोली पोहोचली २६ मीटरपर्यंत, २४ तास ४० हून अधिक गाड्या सुरू...
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
हिंदू मुलीची धर्मांधाच्या ताब्यातून ४८ तासांत सुटका!; पैठणहून केले होते अपहरण, नवी मुंबईत आवळल्या मुसक्या!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software