खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहरात नायलॉन मांजामुळे दुखापत होण्याच्या घटना वाढल्याने शहर पोलिसांनी हा मांजा विकणाऱ्या आणि बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. रविवारी (७ डिसेंबर) तिघांवर कारवाई करून त्यांच्या ताब्यातून नायलॉन मांजाचे ५५ गट्टू (किंमत ३६ हजार १००) जप्त करण्यात आले. दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नायलॉन मांजा विकणाऱ्या व विकत घेणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

रिजवाना बेगम निसार शेख (वय ४५, रा. संजयनगर), शेख फिरोज हबीब शेख (वय ४२, रा. संजयनगर), इस्माइल शेख उर्फ आदिल हाजी शेख (वय ३२, रा. सातारा गाव) अशी संशयितांची नावे आहेत. १४ जानेवारीला मकरसंक्रांतीचा सण असून, यानिमित्ताने शहर-जिल्ह्यात पतंग उडवले जात आहेत. काही व्यापारी नायलॉन व चायनीज मांजा विक्रीसाठी ठेवतात. हा मांजा अत्यंत बारीक व धातूदार असल्यामुळे पशू-पक्षी यांनाही इजा होते. लोकांच्याही जीवितास धोका निर्माण होत असल्याच्या घटना काही दिवसांपूर्वी समोर आल्या आहेत. गेल्या ४ डिसेंबरला सातारा येथील खंडोबाच्या दर्शनासाठी आई-वडिलांसोबत दुचाकीवरून जाणाऱ्या ३ वर्षीय मुलाचा नायलॉन मांजाने गळा कापला गेला. त्याच्या गळ्याला २० हून अधिक टाके द्यावे लागले.

त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील दुकानदार किंवा इतरांनी नायलॉन व चायनीज मांजा स्वतः जवळ बाळगू नये, वापर करू नये, असे आवाहन करतानाच नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
या अनुषंगाने रविवारी (७ डिसेंबर) पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे सहकाऱ्यांसह गस्त घालत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संजयनगर भागात एका घरात नायलॉन मांजा विक्री केला जात आहे. पोलिसांनी संजयनगर येथे जाऊन शोध घेतला असता रिजवाना शेख आणि शेख फिरोज यांच्या घरात नायलॉन मांजाचे ५१ गट्टू मिळून आले. दोघांविरुद्ध जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

शेख फिरोजला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. रविवारी याच पथकाने सातारा गावातही कारवाई केली. तेथे शेख इस्माइल हा दुकानात नायलॉन मांजा विकत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नायलॉन मांजाचे ४ गट्टू जप्त केले. त्याच्याविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, सहायक पोलीस आयुक्त श्रीमती वसुंधरा बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे, पोलीस अंमलदार सुनिल जाधव, शोन पवार, सुनिल पाटील, दीपक शिंदे, वाडीलाल जाधव, प्रिती इलग यांनी केली.

नायलॉन मांजा विक्री करणारे व साठवणूक करणाऱ्या व्यक्तींबाबत काही माहिती असल्यास तात्काळ टोल फ्री नंबर ११२ व नियंत्रण कक्ष क्र. ०२४०-२२४०५०० यावर संपर्क साधून माहिती कळवावी. माहिती कळविणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
- प्रवीण पवार, पोलीस आयुक्त

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software