पडेगावमध्ये मनपा ड्रेनेजलाइनच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना, मातीचा ढिगारा अंगावर कोसळून तरुणाचा मृत्यू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिकेच्या ड्रेनेजलाइनचे काम करताना अंगावर मातीचा ढिगारा कोसळून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना पडेगावच्या कासंबरी दर्गा परिसरात मंगळवारी (१६ डिसेंबर) संध्याकाळी घडली. महेशभाई रूपसिंग डांगोर (रा. गुजरात) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोटाखी खळगी भरण्यासाठी तो घरापासून इतक्या दूर आला होता. मात्र काळाने त्याच्या कुटुंबाचा आधारच हिरावून घेतला.

ड्रेनेजसाठी जेसीबीच्या साहाय्याने सुमारे ५ फूट खोल चारी खोदण्याचे काम सुरू असताना चारीत महेश काम करत होता. चारीतून उपसलेली माती व दगडांचा ढिगारा बाजूलाच टाकण्यात येत होता. हा ढिगारा अचानक महेशवर कोसळून मातीखाली तो दबला. सोबतच्या कामगारांनी आरडाओरड सुरू केल्याने तातडीने मदतकार्य करण्यात आले. सर्वांनी जिवाच्या आकांताने माती बाजूला केली आणि महेशला बाहेर काढले. त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची नोंद छावणी पोलिसांनी घेतली आहे. मंगळवारी सकाळी महेशने आईला कॉल केला होता. आई, लवकरच घरी पैसे पाठवतो, असे तो म्हणाला होता. गुजरातला त्याच्या घरी आई, वडील व एक भाऊ आहे. चारी खोदल्यानंतर माती, दगड काही अंतरावर टाकले असता तर महेशचा जीव गेला नसता.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software