छत्रपती संभाजीनगरमध्ये धडाकेबाज कारवाई... अवघ्या विशीतल्या पोरांनी क्षणीक स्वार्थापोटी करून घेतले आयुष्याचे मातेरे!; नायलॉन मांजाचा साठा बाळगला अन्‌ कायद्याच्या जंजाळात अडकले!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ऐन तारुण्यात एक चूक आता अवघ्या विशीतल्या मुलांना कायद्याच्या जंजाळात अडकवणारी ठरली आहे. नायलॉन मांजा बाळगणे, विकणे गुन्हा आहे, हे पोलीस वारंवार सांगत आहेत. कारवाया करत आहेत. तरीही या मुलांनी धाक न बाळगल्याने आता त्यांच्या आयुष्याचे मातेरे झाले आहे. शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी (१५ डिसेंबर) रात्री वाळूज एमआयडीसी आणि शहरात धडाकेबाज कारवाया करत पाच तरुणांच्या घर, दुकानांवर छापे मारले आणि एकूण २ लाख ७० हजार रुपयांचे ३०० गट्टू जप्त केले.

याप्रकरणात शहर गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार राहुल बंगाळे यांनी तक्रार दिली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक प्रविण वाघ यांना सोमवारी (१५ डिसेंबर) गुप्त बातमीदाराने माहिती दिली, की रांजणगाव ते कमळापूर रोडवर पुष्पनगरी येथे एक जण त्याच्या तळमजल्यामधील शटरमध्ये नायलॉन मांजाची साठवणूक करून विकत आहे. वाघ यांनी लगेचच सहकारी पोलीस अंमलदार योगेश नवसारे, विजय निकम, राजेश यदमळ, अक्षय नाटकर, शारुख शेख, दिनकर आवारे, संजीवनी शिंदे, चालक पोलीस अंमलदार सोमनाथ दुकले यांच्यासह पुष्पनगरीत धाव घेतली. रात्री साडेनऊच्या सुमारास संशयित दुकानावर छापा मारला. दुकानमालकाने त्याचे नाव रुद्रांक्ष संतोष बुरसे (वय २२, रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले. पोलिसांनी त्याच्या दुकानाची झडती घेतली असता नायलॉन मांजाचे ५४ हजार ९०० रुपयांचे ६१ गट्टू मिळून आले. पोलिसांनी ते जप्त करून रुद्रांक्षला ताब्यात घेतले. रुद्रांक्षने सांगितले, की माझा मित्र भागवत अंबादास जाधव (वय २०, रा. जयभवानीनगर, म्हाडा कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) याला नायलॉन मांजाचे एकूण ३ बॉक्स व राज विनोद जगताप (वय २०, रा. डिंबारगल्ली, बेगमपुरा) याला नायलॉन मांजाचा १ बॉक्स विकला आहे. त्यामुळे पोलिसांनी लगेचच रात्री अकराला भागवत जाधवच्या स्वामी समर्थ किराणा दुकानावर छापा मारून नायलॉन मांजाचे १ लाख २९ हजार ६०० रुपयांचे एकूण १४४ गट्टू जप्त केले. भागवत जाधने रुद्रांक्षकडून ३ बॉक्स आणि इतर ठिकाणावरून २ बॉक्स खरेदी केले होते. त्यापैकी त्याचा मित्र रोहन राजेंद्र ढेंगळे (वय २०, रा. छत्रपतीनगर, बजाजनगर) याला ३० गट्टू व संदीप राजू डोईफोडे (वय २०, रा. वडगाव कोल्हाटी) याला १ बॉक्स विकला होता. पोलिसांनी रोहन ढेंगळेच्या घरी जाऊन झडती घेतली. त्याच्या घरात २३ हजार ४०० रुपयांचे २६ गट्टू मिळून आले. त्यानंतर पोलिसांनी संदीप डोईफोडेचे घर गाठले. त्याच्या घरातून ४१ हजार ४०० रुपयांचे ४६ गट्टू जप्त केले. त्यानंतर राज जगताप यांच्या डिंबारगल्ली, बेगमपुऱ्यातील घरी पोलिसांनी छापा मारला. त्याच्या घरातून २० हजार ७०० रुपयांचे २३ गट्टू जप्त केले. असे एकूण पोलिसांनी २ लाख ७० हजार रुपयांचे ३०० गट्टू जप्त केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...

Latest News

दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले... दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर येथे सोमवारी (२ मार्च) सायंकाळी होळी पूजन झाले. त्यानंतर...
प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार
छत्रपती संभाजीनगरजवळ बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन?; उत्खननाची खोली पोहोचली २६ मीटरपर्यंत, २४ तास ४० हून अधिक गाड्या सुरू...
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
हिंदू मुलीची धर्मांधाच्या ताब्यातून ४८ तासांत सुटका!; पैठणहून केले होते अपहरण, नवी मुंबईत आवळल्या मुसक्या!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software