तू मला आवडतेस, बोलली नाहीस तर बदनामी करेन... धमकावत अल्पवयीन मुलीचा पाठलाग, विनयभंग, २३ वर्षीय तरुणाला अटक, सिडको एमआयडीसीतील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेटोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग, सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी दिल्याप्रकरणी समीर शेख रसूल शेख (वय २३, रा. हुसेन कॉलनी, गारखेडा परिसर) याला मंगळवारी (१७ फेब्रुवारी) विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. आर. उबाळे यांनी १९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

मुलीच्या तक्रारीनुसार, समीरने डिसेंबर २०२५ ते १६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान तिचा पाठलाग करून विनयभंग केला होता. तू मला आवडतेस. तू मला बोलली नाहीस तर तुझे फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी करेल, अशी धमकी त्याने दिली होती. मुलगी आणि समीर दोघेही भिन्न समुदायाचे आहेत. मुलीच्या तक्रारीवरुन समीरविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी (१६ फेब्रुवारी) गुन्हा दाखल केला. समीरला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले, की संशयित आणि तक्रारदार दोघेही भिन्न समुदायाचे असल्याने संशयिताला जामीन दिल्यास जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली. न्यायालयाने समीरची रवानगी ५ दिवसांच्या पोलीस कोठडीत केली. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे भाजप नगरसेवक नावंदर यांच्या निवडीवर आक्षेप

Latest News

छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे भाजप नगरसेवक नावंदर यांच्या निवडीवर आक्षेप छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे भाजप नगरसेवक नावंदर यांच्या निवडीवर आक्षेप
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महानगरपालिकेच्या सत्ताधारी भाजपसाठी एक धक्कादायक बातमी आहे. निवडणुकीचे निकाल लागून काही दिवस उलटत नाहीत,...
मुलीला कॉल केल्यावरून तरुणाला बेल्टने बेदम मारहाण, आधी कॉलेजमध्ये नंतर रूममध्ये घुसून हल्ला, सिडकोतील घटना
बनोटीच्या यात्रेत चोरट्यांनी घातला धुमाकूळ; १५ महिलांचे तब्बल १० लाखांचे दागिने लंपास
गोळीबार करून पोलिसांशी पंगा घेणाऱ्या ८ जणांच्या टोळीवर ‘मोक्का'ची कारवाई; छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्‍तांचे कठोर पाऊल
फुलंब्रीत जनावरांच्या वाहतुकीवरून पोलीस- गोरक्षकांमध्ये जोरदार वादावादी, पोलिसांनी गोरक्षकांना मारहाण केल्याचा आरोप
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software