- News
- सिटी क्राईम
- मला सैन्यात भरती व्हायचं होतं, लष्करी गणवेशाची आवड होती म्हणून...; रुचिकाच्या बोलण्यावर ATS, लष्कराच...
मला सैन्यात भरती व्हायचं होतं, लष्करी गणवेशाची आवड होती म्हणून...; रुचिकाच्या बोलण्यावर ATS, लष्कराचे गुप्तचर खाते विश्वास ठेवणार?
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : रुचिका अजित जैन... वय ४८... रा. धरमपूर, ता. छत्रपती संभाजीनगर... सैन्य दलात कॅप्टन असल्याचे भासवून लोकांना फसवत असल्याने दौलताबाद पोलिसांनी गुरुवारी (११ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता तिला अटक केली. त्यानंतर लष्कराच्या गुप्तचर खात्याने आणि दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) तिची शुक्रवारी (१२ सप्टेंबर) कसून चौकशी केली. तिने असे वागण्याचे कारण त्यांना सांगितले आहे. तिच्याविरुद्ध दाखल केलेले गुन्हे जामीनपात्र असल्याने नोटीस देत पुन्हा चौकशीसाठी राहण्यासाठी बजावण्यात आले आहे.
रुचिका दौलताबादसह परिसरात भारतीय सैन्य दलात कॅप्टन असल्याचे सांगायची आणि लष्करी गणवेशात फिरत होती. पुणे येथील मिलिटरी इंटेलिजन्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी दौलताबाद पोलिसांच्या सहाकार्याने तिला पकडले. तिच्या धरमपूर गावातील घरावर छापा मारला तेव्हा ती आर्मी युनिफॉर्ममध्येच होती. कसून चौकशी केल्यानंतर तिच्याकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे नव्हती. सैन्य दलाशी तिचा प्रत्यक्ष संबंधही नव्हता. घरझडतीत पॅरा फोर्सचे चिन्ह, ३ स्टार असलेला आर्मी युनिफॉर्म, रूचिका जैन नावाची नेम प्लेट, स्पेशल फोर्सचा लाल पट्टा, कॅप, बेल्ट, शूज, ग्लोज, फेस मास्क, मोजे, डेबोनिअर द सिक्युरीटी पिपल नावाचे बनावट आयकार्ड, ५.५ मिमी हॉक टॉय एअर पिस्टल, ई.एस.ए ६५ स्पोर्ट्स एअर रायफल, ट्रॉफी आढळली. स्वतःला सैन्यात कॅप्टन असल्याचे सांगत असल्याने विविध संस्था, शाळा, कोचिंग क्लासेसही तिचा सत्कार ठेवत होते. विशेष म्हणजे, सैन्यदलात गुप्तचर अधिकारी असल्याचे सांगून सध्या गुप्त मोहिमेवर असल्याचे ती उघडपणे सांगत होती.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या!
By City News Desk
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!; महसूल मंत्र्यांची घोषणा
By City News Desk
युवकाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या, सिल्लोडच्या सिसारखेड्याची घटना
By City News Desk
Latest News
10 Mar 2026 06:48:26
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...

