मी एका मुलासोबत सुरतला निघालेय… त्वचेच्या उपचारासाठी छ. संभाजीनगरला आलेल्या मुलीने बसस्थानकावरूनच आईला सांगितले!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : त्‍वचेच्या उपचारासाठी वाशिम जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगरला आलेली १७ वर्षीय मुलगी बसस्थानकावर टॉयलेटला जाते असे आईला सांगून गेली आणि गायब झाली. आईने कॉल केला असता मी मुलासोबत सुरतच्या बसमध्ये बसली आहे, असे तिने सांगितले. तिच्या आईने क्रांती चौक पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार रविवारी (१३ जुलै) नोंदवली असून, पोलीस तिचा शोध […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : त्‍वचेच्या उपचारासाठी वाशिम जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगरला आलेली १७ वर्षीय मुलगी बसस्थानकावर टॉयलेटला जाते असे आईला सांगून गेली आणि गायब झाली. आईने कॉल केला असता मी मुलासोबत सुरतच्या बसमध्ये बसली आहे, असे तिने सांगितले. तिच्या आईने क्रांती चौक पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार रविवारी (१३ जुलै) नोंदवली असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत.

३२ वर्षीय महिलेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्‍या वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्‍यातील वनोजा येथे राहतात. त्‍या १७ वर्षीय मुलीला घेऊन त्वचेच्या उपचारासाठी शनिवारी (१२ जुलै) संध्याकाळी पाचला छत्रपती संभाजीनगरला आल्या होत्‍या. मध्यवर्ती बसस्थानकावर मुलीने टॉयलेटमध्ये जाऊन येते, असे सांगून गेली. खूप वेळ झाल्यानंतरही ती परतली नाही. त्यामुळे महिलेने तिचा टॉयलेटमध्ये व आजूबाजूला शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. तिला कॉल केला असता तिने सांगितले, की मी एका मुलासोबत सूरतच्या बसमध्ये बसले आहे. महिलेला वाटले की ती खोटे बोलत असावी. त्‍यामुळे महिला गावी परत गेली. मात्र तिथेही ती आलेली नव्हती. तिला कोणीतरी पळवून नेले आहे, असे तक्रारीत म्‍हटले आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश कांदे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता

Latest News

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज, ३१ जुलैला निकाल दिला आहे. १७ वर्षांनंतर...
घरी बसून करा हजारो रुपयांचे मोफत फेशियल!; सगळे तुम्हाला विचारतील, तुमच्या चमकत्या त्वचेचे रहस्य काय?
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
रत्नाकर फायनान्समधून महिलांना अश्लील कॉल!; जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, कसे येतात कॉल, कुठून मिळवतात नंबर, जाणून घेऊ...
मोबदला न देता मालमत्ता पाडाल तर सामूहिक आत्‍मदहन करू!;  हर्सूलवासियांचा पवित्रा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software