डीसीपी शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या बंगल्यात नोकरानेच केली चोरी!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर पोलीस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या बंगल्यात नोकरानेच चोरी केल्याचा धक्कायक प्रकार समोर आला आहे. सोन्याच्या २ बांगड्या आणि ४ हजार रुपयांवर त्याने डल्ला मारला. वेदांतनगर पोलिसांनी नोकराला अटक केली आहे.

शहर पोलीस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या आई उर्मिला सुभाष घारगे (वय ६७ रा. श्रध्दा बंगलो पार्श्वनाथ कॉलनी दामिनी रोड विश्रामबाग सांगली) यांनी वेदांतनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून नोकर सुमित सुभाष निनांदे (वय २८, रा. नंदनवन कॉलनी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्मिला घारगे या सध्या मुलीकडे मनिषा कॉलनी अदालत रोड छत्रपती संभाजीनगर येथे आल्या आहेत. ६ जानेवारीला दुपारी १२ च्या सुमारास हातातील सोन्याच्या बांगड्या त्यांनी मुलीच्या बेडरूममधील ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवरमध्ये प्लास्टिक डब्यात ठेवल्या होत्या. १३ जानेवारीला दुपारी २ च्या सुमारास किरकोळ खर्चासाठी पैसे घ्यायचे असल्याने पर्स पाहिली असता पर्समध्ये चार हजार रुपये कमी दिसले. पैसे दुसरीकडे ठेवले असतील असे वाटून त्यांनी दुर्लक्ष केले.

१६ जानेवारीला दुपारी ४ च्या सुमारास त्यांना दोन- तीन दिवस गावी जायचे असल्याने सोन्याच्या बांगड्या घालण्यासाठी पाहिल्या असता प्लास्टिक डब्यात ठेवलेल्या सोन्याच्या बांगड्या दिसल्या नाहीत. त्यांनी सन २०१० मध्ये लग्नावेळी १६ हजार रुपये प्रतितोळ्याने अंदाजे आठ तोळे वजनाच्या (किंमत १ लाख ६० हजार रुपये) दोन सोन्याच्या बांगड्या खरेदी केल्या होत्या. पर्समधील चार हजार रुपये व सोन्याच्या बांगड्या घरातून चोरी झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सोन्याच्या बांगड्या काढून ठेवत असताना व पर्समध्ये पैसे ठेवत असताना नोकर सुमित निनांदे हा खोलीत साफसफाईचे काम करत होता. त्यामुळे त्यांच्यावरच संशय बळावला. त्याचा जबाब पोलिसांनी नोंदवला असता विसंगती आढळली. त्याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने चोरी केल्याची कबुली दिली. त्याला अटक करण्यात आली आहे. नोकरानेच असा घात केल्याने विश्वास कुणावर ठेवावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना

Latest News

धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लग्नानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील...
३८ वर्षीय महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, वाळूज MIDC तील घटना
तलावात पोहताना दोन मुलांचा बुडून मृत्यू, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दुर्घटना
करमाडजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : ट्रकने ५ कामगारांना उडवले, तिघांचा जागीच मृत्‍यू, २ गंभीर
वाळूज MIDC तील ठाकरे गटाच्या आंदोलनाला हिंसक वळण!; सोनवणेंना अक्षरशः ढकलत पोलिसांनी गाडीत बसवले, संतप्त नागरिकांनी मडके पोलिसांवर फेकले, हजार-दीड हजार लोकांचा पोलीस ठाण्याला घेराव
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software