प्रेयसीने बोलण्यास नकार दिल्याने प्रियकराने सुरू केले धमकीसत्र!; छत्रपती संभाजीनगरातील घटना, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. कालांतराने तिने त्याच्याशी ब्रेकअप केले. मात्र तोपर्यंत प्रेम डोक्यात शिरलेल्या प्रियकराने प्रेमाचा हट्ट करत तिला धमकावयाला सुरुवात केली. तिच्या वडिलांनाही कॉल करून धमकावले. अखेर तिने करमाड पोलीस ठाणे गाठून प्रियकराविरुद्ध शुक्रवारी (७ नोव्‍हेंबर) तक्रार दिली आहे.

१९ वर्षांची श्रुती (नाव बदलले आहे) छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. तिचे शिक्षण १२ वी पर्यंत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेवगा येथे झाले. सध्या ती छत्रपती संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर भागात पोलीस भरतीची तयारी करत आहे. तिच्याकडे सॅमसंग कंपनीचा मोबाइल असून, त्याद्वारे ती तिचे इन्स्टाग्राम खाते चालवते. त्यावर सहा महिन्यांपूर्वी प्रमोद प्रल्हाद काकड (रा. वाकी खुर्द ता. सिंदखेड राजा) याच्यासोबत तिची ओळख झाली. त्याने तिचा मोबाइल नंबर घेतला. त्यानंतर दोघे एकमेकांसोबत कॉलवर बोलू लागले. श्रुतीच्या तक्रारीनुसार, ती त्याच्याशी जास्त बोलत नव्हती. मात्र तो नेहमी कॉल करून बोलत असे.

ओळख झाल्यावर तो तिला भेटायला छत्रपती संभाजीनगरला टीव्ही सेंटर येथे आला. त्यावेळी दोघांनी मोबाइलमध्ये फोटोही काढले. १७ ऑक्‍टोबरला सकाळी १० ला दिवाळीसाठी श्रुती गावी गेली असता प्रमोद काकड तिला वारंवार कॉल करून माझ्याशी फोनवर बोल. मी तुझ्यावर प्रेम करतो, असे म्हणू लागला. त्यावर ती त्याला म्हणायची, की तू मला फोन करू नको. मला तुझ्याशी काही बोलायचे नाही. तू मला वारंवार फोन करत जाऊ नको.

तरीही तो तिला वारंवार फोन करत असल्याने तिने त्याचा मोबाइल नंबर ब्लॉक केला. त्यानंतर तो श्रुतीच्या वडिलांच्या मोबाइलवर कॉल करू लागला. तिच्या वडिलांना म्हणाला, की मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचे आहे. त्यानंतरही तिची इच्छा नसताना तिला कॉल करून तिचा पाठलाग करत होता. शुक्रवारी (७ नोव्‍हेंबर) सकाळी साडेदहाला पुन्हा त्याने तिच्या वडिलांच्या फोनवर कॉल केला व धमकावले, की माझे लग्न तुमच्या मुलीसोबत लावून द्या. नाहीतर तिला मी मारून टाकेन. त्यामुळे घाबरलेल्या श्रुतीने करमाड पोलीस ठाणे गाठून प्रमोदविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार

Latest News

प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील २८ वर्षीय तरुणीचे लग्न प्रियकराने नियोजित वराला मेसेज, फोटो...
छत्रपती संभाजीनगरजवळ बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन?; उत्खननाची खोली पोहोचली २६ मीटरपर्यंत, २४ तास ४० हून अधिक गाड्या सुरू...
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
हिंदू मुलीची धर्मांधाच्या ताब्यातून ४८ तासांत सुटका!; पैठणहून केले होते अपहरण, नवी मुंबईत आवळल्या मुसक्या!
स्कुटी दुभाजकाला धडकून दोन तरुणांचा मृत्यू, पाचोडजवळील दुर्घटना, दोन्ही तरुण छत्रपती संभाजीनगर शहरातील
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software