वाळूज MIDC तील अनन्या पॉलिप्लास्ट कंपनीत २३ वर्षीय तरुणीसोबत मोठी दुर्घटना, कंपनी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील अनन्या पॉलिप्लास्ट या कंपनीत झालेल्या दुर्घटनेत २३ वर्षीय तरुणीचा हात कायमचा निकामी झाला आहे. कंपनी मालकाने तिला मशीनवर काम येत असतानाही कामाला बसवल्याने तिचा हात मशीनमध्ये अडकला. ती हेल्पर म्हणून कंपनीत कामाला लागली होती, कंपनी मालकाने मशीन ऑपरेटर महिला वॉशरूमला गेल्यानंतर तरुणीला मशीनवर बसविले अन्‌ तिला हात गमवावा लागला. या प्रकरणात तरुणीच्या तक्रारीवरून शुक्रवारी (२५ जुलै) वाळूज एमआयडीसी पोलिसांनी कंपनीमालक दयानंद गिरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

पूजा गंगाधर पांचाळ (वय २३, रा. बेलाचा मळा विटावा ता. गंगापूर) या विवाहित तरुणीने या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्या पती, मुलाबाळांसह राहतात. त्यांचे पती खासगी वाहनावर चालक आहेत. त्या अनन्या पॉलिप्लास्ट नावाच्या कंपनीत हेल्पर म्हणून २० दिवसांपासून काम करत होत्या. २३ जून रोजी सकाळी त्या नेहमीप्रमाणे सकाळी आठला कंपनीत कामासाठी गेल्या होत्या. कंपनीत हेल्पर असताना कंपनीचे मालक दयानंद गिरी यांनी मशिनचे काही एक ज्ञान नसताना पूजा यांना मशिनवर ऑपरेटर म्हणून कामाला बसवले. पूजा यांनी मला मशिनचे काम येत नाही, असे सांगूनही दयानंद म्हणाला, की काही अवघड नाही.

सर्व मशिन सुरक्षित आहे. तू केले तर तुला जमेल, असे सांगून त्यांना मोल्डींग मशिनवर कामाला बसवले. सकाळी सव्वानऊला मोल्डींग मशिनवर काम करत असताना त्यांचा उजवा हात मोल्डींग मशिनमध्ये अडकून कोपऱ्यापासून थोडेसे पुढे हात कट झाला. त्यानंतर कंपनी मालक दयानंद गिरी याने पूजा यांना वाळूज एमआयडीसीतीलच लिलासन्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तिचा  उजवा हात अर्धा भाग निकामी झाल्याने काढून टाकला आहे. शुक्रवारी (२५ जुलै)  या प्रकरणात पूजा यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलीस अंमलदार एकनाथ गिरी करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

२५ वर्षीय विशालचा घात की अपघात?, वडोद बाजार पोलिसांकडून चौकशी सुरू, फुलंब्री तालुक्‍यात नक्की काय घडलं...

Latest News

२५ वर्षीय विशालचा घात की अपघात?, वडोद बाजार पोलिसांकडून चौकशी सुरू, फुलंब्री तालुक्‍यात नक्की काय घडलं... २५ वर्षीय विशालचा घात की अपघात?, वडोद बाजार पोलिसांकडून चौकशी सुरू, फुलंब्री तालुक्‍यात नक्की काय घडलं...
फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : फुलंब्री तालुक्‍यातील टाकळी कोलते येथील २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह फुलंब्री-राजूर रोडवर पाझर तलावाजवळ संशयास्पद स्थितीत आढळल्‍याने...
सैराट पार्ट २ : आधी हॉस्पिटलसमोरून पळवले होते, पोलिसांनी पकडून आणले, आता पुन्हा घरातून प्रेयसीला नेले... मुलगी दहावीत शिकते, मुलगा २१ वर्षांचा, बजाजनगरातील खळबळजनक घटना
ड्रग्‍ज विकण्यासाठी येताच पोलिसांनी घातली झडप!, चिकलठाण्यात ९० हजारांचे एमडी ड्रग्‍ज जप्त, एकाला अटक, पोलीस पुरवठादाराच्या शोधात
कुख्यात गुंड जमीर कैचीने निर्माण केली दहशत, खंडणीसाठी मोबाइल दुकान फोडले, व्यावसायिकावर लोखंडी सळईचे वार, किराडपुऱ्यातील धक्कादायक घटना
डिजिटल अरेस्ट रॅकेट छत्रपती संभाजीनगरातून?; तामिळनाडूच्या पोलिसांनी वाळूज MIDC तून दोघांना केली अटक
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software