- News
- सिटी क्राईम
- छत्रपती संभाजीनगरात महिनाभरात आढळले ८ मृतदेह, ज्यांची ओळख पटली नाही, अशा अवस्थेत होते, की तुम्ही बघू...
छत्रपती संभाजीनगरात महिनाभरात आढळले ८ मृतदेह, ज्यांची ओळख पटली नाही, अशा अवस्थेत होते, की तुम्ही बघूही शकणार नाही...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर शहरात अनोळखी मृतदेह मिळून येण्याचे प्रमाण लक्षणीय ठरत आहे. १ ऑक्टोबरपासून आज, ९ नोव्हेंबरपर्यंत एकूण ८ अनोळखी मृतदेह पोलिसांना मिळून आले. कालच शनिवारी (८ नोव्हेंबर) वाळूज एमआयडीसीतून एक अनोळखी मृतदेह पोलिसांनी घाटी रुग्णालयात आणला होता.
पोलीस ओळख पटवण्यासाठी चेहरा, कपडे, दागिने, टॅटू, दस्तऐवज तपासणी करतात. यात मृताच्या अंगावर असलेले कपडे, दागिने, ओळखपत्र, मोबाइल, कागदपत्रे तपासली जातात. परिसरातील रहिवासी, दुकानदार, सीसीटीव्ही फुटेज पाहून ओळख करण्याचा प्रयत्न केला जातो. फोटो सार्वजनिक केला जातो. बोटांचे ठसे काढून पोलीस डेटाबेसशी जुळवतात. ओळख न पटल्यास DNA, दातांची रचना (Dental Records) यांचा उपयोग केला जातो. मृतदेहाला सरकारी रुग्णालयात आणले जाते. पोस्टमॉर्टेमची नोंद होते. मृत्यूचा प्रकार तपासला जातो. जर मृत्यू संशयास्पद असेल तर गुन्हा दाखल केला जातो. खुनाच्या संशयावरून खुनाचा गुन्हा दाखल करून तपास केला जातो. मृतदेह ज्या ठिकाणी आढळला त्या आधारावर पोलीस इतर जिल्ह्यांना किंवा राज्यांना माहिती पाठवतात. साधारणतः मृतदेह हॉस्पिटलच्या मॉर्चरीमध्ये काही दिवस ठेवला जातो, जेणेकरून नातेवाईकांना ओळख पटवता येईल. ठराविक कालावधीत कोणीही पुढे न आल्यास सरकारी खर्चाने अंतिम संस्कार केला जातो. फोटो, बोटांचे ठसे व डीएनए नमुने भविष्यासाठी जतन ठेवले जातात.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
By District Correspondent
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
By District Correspondent
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
By District Correspondent
विदेशी नागरिकाला अवैध घर भाड्याने दिले; पोलिसांनी घरमालकावर दाखल केला गुन्हा
By District Correspondent
Latest News
17 Feb 2026 20:11:16
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...

