गुगलवर नंबर सर्च करणे पडणार होते महागात, पण २० मिनिटांत जवाहरनगर पोलिसांनी अशी जादूची कांडी फिरवली, की वृद्ध दाम्‍पत्‍याचे वाचले ३ लाख!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : गुगलवर नंबर सर्च करणे एका वृद्ध दाम्‍पत्‍याला चांगलेच महागात पडले असते. वेळीच पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेले आणि पोलिसांनी तत्काळ हालचाली करत सायबर भामट्याच्या खात्यात गेलेले २ लाख रुपये होल्ड करण्यात यश मिळवले. अवघ्या २० मिनिटांत पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे दाम्‍पत्‍याच्या खात्यातील एकूण ३ लाख रुपये वाचविण्यात यश आले. ही घटना मंगळवारी (१४ ऑक्‍टोबर) दुपारी चारच्या सुमारास घडली.

मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास ज्येष्ठ नागरिक दाम्पत्य रमेश कुलकर्णी व सौ. शैलजा कुलकर्णी (रा. लक्ष्मीनगर गारखेडा परिसर) यांच्या टाटा स्काय डिशमध्ये एरर येत असल्याने त्यांनी गुगलवर कस्टमर केअर नंबर सर्च केला. अनेकदा सायबर भामटे अशा पद्धतीने त्‍यांचे नंबर गुगलवर टाकून ठेवत असतात. कुलकर्णी यांनी अशाच नंबरवर कॉल केला असता एरर दूर करण्यासाठी ५ रुपये लागतील, असे सायबर भामट्याने सांगितले. कुलकर्णी यांनी होकार देताच त्‍याने अधिकची माहिती घेत एक ॲप डाऊनलोड करायला सांगितले. ज्यामुळे कुलकर्णी यांच्या मोबाइलचा ताबा थेट भामट्याकडे गेला. रमेश कुलकर्णी यांच्या महाराष्ट्र बँक खात्यातून ५ रुपयांऐवजी ९५ हजार रुपये काढण्यात आल्याचा मेसेज आला.

त्यावर कुलकर्णी यांनी लगेचच त्याला ९५ हजार रुपये कसे काढले, असे विचारले असता, तुमच्याकडून चुकून आले आहेत. ते तुम्हाला परत करणे आहेत, असे सांगून ९५ हजार रुपये परत करण्यासाठी तुमचा दुसरा अकाउंट नंबर सांगा. जेणेकरून त्यामध्ये पैसे रिफंड करता येईल, असे विचारले. कुलकर्णी पुन्हा जाळ्यात फसले. त्यांनी पत्नी शैलजा कुलकर्णी यांच्या बँक खात्याचा तपशील सांगितला. सर्व हालचाली संशयास्पद वाटल्याने कुलकर्णी यांनी लगेचच त्यांच्या भावाला कळवले. त्यांच्या भावाने सहायक पोलीस आयुक्‍त मनीष कल्याणकर यांना संपर्क करून घडलेला प्रकार सांगितला.

WhatsAppImage2025-10-15at12.59.05PM1

कल्याणकर यांनी लगेचच जवाहरनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांना माहिती देत कारवाईच्या सूचना केल्या. कुंभार यांनी सायबर विभागाचे काम पाहणारे पोलीस अंमलदार मारोती गोरे यांना माहिती देत सूचना व मार्गदर्शन करत कुलकर्णी दाम्पत्याचे खाते ब्लॉक करण्यास सांगितले. तोपर्यंत पती-पत्नी कुलकर्णी हे जवाहरनगर पोलीस ठाण्यात आले. गोरे यांनी एसबीआय बँकेच्या सुतगिरणी शाखेचे व्यवस्थापक प्रवीण सरवदे यांना संपर्क करून तत्काळ कुलकर्णी यांचे खाते ब्लॉक करवले. ही प्रक्रिया २० मिनिटांत झाल्याने कुलकर्णी कुटुंबाचे भामट्याने काढून घेतलेले २ लाख रुपये दुसऱ्या खात्यात जाण्यापासून थांबविण्यात आले.

ॲपद्वारे थेट ओटीपी मिळवू शकत होता भामटा...
मोबाइलमध्ये डाउनलोड करण्यास सांगितलेल्या ॲपद्वारे सायबर भामटा थेट बँकेकडून आलेले ओटीपी मिळवू शकत होता. रमेश कुलकर्णी यांच्या महाराष्ट्र बँक खात्यातील १ लाख ४२ हजार रुपयांपैकी ९५ हजार रुपये भामट्याने काढले होते, तर शैलेश कुलकर्णी यांच्या एसबीआय खात्यातील २ लाख ३५ हजार रुपयांपैकी १ लाख ३५ हजार रुपये काढण्यात आले होते. खात्यात उरलेल्या रक्कमही काढून घेण्यासाठी ओटीपी येतच होते. कुलकर्णी कुटुंबाचे एकूण ३ लाख ४५ हजार रुपये भामट्यांच्या हाती लागण्यापासून वाचले.

कुलकर्णी दाम्‍पत्‍याने मानले पोलिसांचे आभार
सहायक पोलीस आयुक्‍त मनीष कल्याणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मारोती गोरे व पोलीस मित्र रमेश राठोड यांनी वेळ न गमावता तत्काळ केलेल्या प्रक्रियेमुळे कुलकर्णी कुटुंबाचे पैसे वाचले.  त्‍यामुळे या दाम्‍पत्‍याने जवाहरनगर पोलिसांचे आभार मानत नागरिकांना अशा घटनांत सतर्क राहण्याचे आवाहन केले.

 

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 

Latest News

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना  पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...
शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना
कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software