छत्रपती संभाजीनगरमध्ये ४२,२९४ किलो भेसळयुक्त खाद्यतेल जप्त; अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सणासुदीत खाद्यतेलात भेसळ करण्याचे प्रकार वाढत असतात. अन्न व औषध प्रशासन विभागाने ऑगस्टपासून केलेल्या कारवाईत आतापर्यंत ४२ हजार २९४ किलो भेसळयुक्त खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे. यासोबतच भेसळयुक्त भगर, तिखट (मिरची पावडर), मसाले आदी पदार्थांचे साठेही जप्त करण्यात आले असून एकूण जप्त मालाची किंमत ९२ लाख ९६ हजार ७६० रुपये इतकी आहे, अशी माहिती अन्न सुरक्षा अधिकारी श्रीनिवास केदार यांनी दिली आहे.

११ ऑगस्टपासून ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरू केली. खाद्यतेल ४२२९४ किलो किंमत ८४ लाख ४५ हजार ५३७ रुपये, भगर, मिरची पावडर, मसाले आदी अन्न पदार्थ ५१२२ किलो साठा किंमत ६ लाख २३ हजार ४३६ रुपये असा एकूण ९२ लाख ९६ हजार ७६० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
ग्राहकांनी घ्यावयाची काळजी
तेलाचा डबा घेताना त्यावर असलेली बेस्ट बिफोरची तारीख पहावी. डबा सिलबंद आहे की नाही याची खात्री करावी. कोणत्या ब्रँडचे तेल आहे हे तपासून घ्या. तेलाचा डबा नवीन आहे की जुनाच दिला हे तपासून घ्या. शंका आल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधा. तक्रारीसाठी विनामूल्य हेल्पलाईन- १८००११२१००

खाद्यतेलात अशी होते भेसळ
प्रत्येक प्रकारच्या तेलाचे दर वेगवेगळे असतात. त्यामुळे महागड्या तेलात स्वस्त तेल मिसळून भेसळ केली जाते. उदा. शेंगदाणा तेलात सोयाबीन तेल, सुर्यफूल तेलात सोयाबीन तेल, सोयाबीन तेलात पामोलीन तेल मिसळून ग्राहकांना फसवले जाते. डब्यातले तेल हे नेहमीच वजन करून घ्यावे, बऱ्याचदा कमी तेल त्यात दिले जाते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना

Latest News

धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लग्नानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील...
३८ वर्षीय महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, वाळूज MIDC तील घटना
तलावात पोहताना दोन मुलांचा बुडून मृत्यू, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दुर्घटना
करमाडजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : ट्रकने ५ कामगारांना उडवले, तिघांचा जागीच मृत्‍यू, २ गंभीर
वाळूज MIDC तील ठाकरे गटाच्या आंदोलनाला हिंसक वळण!; सोनवणेंना अक्षरशः ढकलत पोलिसांनी गाडीत बसवले, संतप्त नागरिकांनी मडके पोलिसांवर फेकले, हजार-दीड हजार लोकांचा पोलीस ठाण्याला घेराव
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software