अस्तित्वात नसलेली जमीन विकली, व्यावसायिकाला घातला २.८९ कोटींचा गंडा!, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तीन महिला व पाच एजंटांनी मिळून बीडच्या व्यावसायिकाला आधीच प्लॉटिंग करून झालेली, तसेच सातबाऱ्यावर अस्तित्वात नसलेली जमीन विकली आहे. ही बाब समोर आल्यानंतर व्यावसायिकाने सातारा पोलीस ठाण्यात २ कोटी ८९ लाख रुपयांनी फसवणूक झाल्याची तक्रार सातारा पोलीस ठाण्यात केली. त्यावरून सोमवारी (१५ डिसेंबर) पोलिसांनी मंजिरी अलोक चौधरी, स्वप्ना विद्याधर बडीगणवार, मोहिनी दिलबागसिंग, जावेदखान नूरखान पठाण, मैत्रेय प्लॉटिंग सेंटरचा भागीदार सुरेश सीताराम इंगळे, बद्रिनारायण नागोराव करे, साहेबराव कचरू घुगे व बाबूराव आनंद ताठे या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जमीन खरेदी-विक्री व्यावसायिक अशोक चांदमल लोढा (रा. बीड) यांनी या प्रकरणात तक्रार दिली होती. लोढा व त्यांचे भागीदार सय्यद नजीर सय्यद वजीर (रा. बीड) हे छत्रपती संभाजीनगर शहरात जमिन शोधत होते. सातारा परिसरातील गट क्रमांक २० मधील १०३.५५ आर जमीन विक्री असल्याचे त्यांना एजंट शेख रईस शेख रसूल (रा. सातारा गाव) याने सांगितले. रईसने जमीन मालक म्हणून भामट्यांची ओळखही करून दिली. भामट्यांनी स्वतःला जमिनीचे मालक असल्याची बतावणी करून जमिनीचा २ कोटी ४० लाख रुपयांत सौदा ठरवला. सर्व व्यवहारानंतर लोढा यांनी जमिनीची साफसफाई केली. तारांचे कुंपण घातले. तिथे पत्र्याची खोली बांधली. ते सर्व राजीव खेडकर यांनी मार्च २०२५ मध्ये काढून टाकले. या जमिनीचे मालक १९८४ पासून खेडकर असताना भामट्यांनी स्वतःची जमीन भासवून, बनावट कागदपत्रे तयार करून सर्व व्यवहार केल्याचे समोर आले. लोढा यांनी खेडकर यांची भेट घेतल्यावर ही बाब समोर आली. विशेष म्हणजे, मंजिरी, स्वप्ना, मोहिनीने चक्क अस्तित्वात नसलेले क्षेत्र विकले. प्लॉटिंगसाठी आधीच विकलेली आणि रस्त्यासाठी सोडलेली शिल्लक जागाही भामट्यांनी विकली होती. आपली मोठीच फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर लोढा यांनी सातारा पोलिसांत धाव घेऊन तक्रा दिली.

अशी केली फसवणूक...
सुरेश इंगळे, बद्रिनारायण करे, साहेबराव घुगे, बाबुराव ताठे यांनी मैत्रेय प्लॉटिंग फर्मच्या वतीने इसार पावती करून दिली. यावेळी लोढा यांनी ११ लाख रुपये रोख तर ३९ लाख रुपये धनादेशाद्वारे अदा केले. काही दिवसांनी आणखी १८ लाख रुपये बीडमध्ये अदा केले. त्यानंतर १०३.५५ आर क्षेत्राचे खरेदीखत १८ एप्रिल २०२४ रोजी भामट्यांनी लोढा यांना करून दिले. लोढा यांनी त्यांना १ कोटी ६१ लाख रुपये धनादेशाद्वारे दिले. ३५ लाख रुपये रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्यूटी व २५ हजार रुपये कागदपत्रांसाठी खर्च झाले. १५ लाख रुपये खर्च करून लोढा यांनी जमिनीची साफसफाई केली. तारांचे कुंपल घातले. पत्र्याची खोली बांधली होती. खेडकर यांनी ते काढून टाकल्यानंतर त्यांच्या वॉचमनसोबत हाणामारीही केली. त्यावरून सातारा पोलीस ठाण्यात २६ मार्चला लोढा आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. लोढा यांच्या म्हणण्यानुसार, भामट्यांना त्यांना असे सांगितले होते, खेडकर यांनीच काहीतरी घोटाळा केला असावा. विशेष म्हणजे भामट्यांनी तुमचे पैसे करून देण्यासाठी तिसऱ्या माणसाला जमीन विकू, अशी ऑफरही लोढा यांना दिली होती. अधिक तपास पोलीस निरीक्षक संभाजी पवार, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...

Latest News

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा... छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
तुझ्यामुळेच पराभूत झालो म्हणत भाजप उमेदवाराच्या घरावर टोळक्याचा सशस्‍त्र हल्ला!, क्रांती चौक भागातील गांधीनगरातील मध्यरात्रीचा थरार
विकास जैन यांनी ACP देशमुख यांचा गळा पकडून मागे ढकलले, बाकीच्यांनी हल्ला केला, म्हणून पोलिसांनी लाठीमार केला!; जैन, राजपूत, जीवनवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, शासकीय अभियांत्रिकी महावि‌द्यालयाच्या मतमोजणी केंद्रावरील दुसरी बाजू आली समोर 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software