- News
- सिटी क्राईम
- हायप्रोफाइल स्टोरी : ड्रग्जच्या नशेत राहणारा पती, अनेक मुलींसोबत त्याचे अनैतिक संबंध, वरून पैशांचा...
हायप्रोफाइल स्टोरी : ड्रग्जच्या नशेत राहणारा पती, अनेक मुलींसोबत त्याचे अनैतिक संबंध, वरून पैशांचा प्रचंड हव्यास… छत्रपती संभाजीनगरच्या उच्चभ्रू कुटुंबातील कन्येसोबत घडला धक्कादायक प्रकार
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गर्भश्रीमंत असले म्हणजे सर्व सुखे पायाशी लोळण घेतातच असं नाही. नातेसंबंधांची कदर अन् त्यात जिव्हाळा-प्रेम नसेल तर प्रचंड पैसा, ऐशोआरामही अपेक्षित सुख देऊ शकत नाही… १ कोटीचे दागिने, दीड कोटी रुपये हुंड्यासह कोट्यवधी रुपये लग्नावर खर्च झाला..मोठी स्वप्नं रंगवून ती सासरी गेली…मात्र तिने रंगवलेली वैवाहिक जीवनाची स्वप्नं भंगली… पती ड्रग्जच्या […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गर्भश्रीमंत असले म्हणजे सर्व सुखे पायाशी लोळण घेतातच असं नाही. नातेसंबंधांची कदर अन् त्यात जिव्हाळा-प्रेम नसेल तर प्रचंड पैसा, ऐशोआरामही अपेक्षित सुख देऊ शकत नाही… १ कोटीचे दागिने, दीड कोटी रुपये हुंड्यासह कोट्यवधी रुपये लग्नावर खर्च झाला..मोठी स्वप्नं रंगवून ती सासरी गेली…मात्र तिने रंगवलेली वैवाहिक जीवनाची स्वप्नं भंगली… पती ड्रग्जच्या नशेत असायचा…. अनेक मुलींसोबत त्याचे अनैतिक संबंध… यामुळे काहीच दिवसांत तिला आपण कुठल्या नरकात आलोय, याची जाणीव झाली… पण आई-वडिलांचे नाव समाजात कमी व्हायला नको, या जिद्दीने तिला सर्वकाही सहन करत आयुष्य काढायचे ठरवले, पण पैशाचा हव्यास जडलेल्या तिच्या सासरच्यांनी आणखी १ कोटीची मागणी करत तिच्या त्याही संसाराला तिलांजली देण्याचा प्रयत्न केला आहे… ३१ वर्षीय युवतीच्या तक्रारीवरून समोर आलेला घटनाक्रम थक्क करणारा आहे… तूर्त या प्रकरणात सिडको एमआयडीसी पोलिसांनी पती अंजन, सासू सुषमा, सासरा अमित, नणंद हर्षिता, चुलत सासरा अमर टिब्रेवाल, लग्नाचा दलाल राजीव अग्रवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
१७ फेब्रुवारी २०२२ रोजी पतीचे माही (नाव बदलले आहे) या मुलीशी झालेली चॅटिंग पियूने वाचली अन् तिला धक्काच बसला. तिने पतीचा इ- मेल चेक केला असता त्यात तिला पतीचे व माहीचे अर्धनग्न फोटो दिसले. त्याविषयी तिने पतीला विचारणा केली असता त्याने कबूल केले की त्याचे माही व इतर अनेक मुलींशी अनैतिक संबंध आहेत. यावरून वाद झाला असता पतीने तिला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यावर पियूने त्याला सांगितले, की मी माझ्या आई- वडिलांना या गोष्टी सांगणार आहे. त्यावर त्याने तिला आश्वासन दिले की यानंतर मी माही व इतर मुलींशी संबंध ठेवणार नाही. परंतु त्याने त्याचे अनैतिक संबंध सुरूच ठेवले.
पियूवरच लावले डिप्रेशनमध्ये असल्याचे आरोप…
पियू भंडाफोड करेल या भीतीने सासूने तिच्यावरच डिप्रेशनमध्ये असल्याचा आरोप केला. तिला जबरदस्ती झोपेच्या गोळ्या देऊ लागली. पण पियूने त्या घेतल्या नाहीत. सासूने पियूला जाणूनबुजून मानसोपचार तज्ज्ञाकडे नेले. तेव्हा मानसोपचार तज्ज्ञाने ती डिप्रेशनमध्ये नसल्याचे सांगितले. सासू मात्र त्यांचे न एेकता पियू मानसिक रुग्ण असल्याचा आरोप करत होती. सासरे व राजीव दुलीचंद अग्रवाल (लग्नाचा दलाल) रा. हैदराबाद, तेलंगणा यांच्यातील संभाषण पियूने ऐकले व पाहिले. त्यांनी पियू व तिच्या आई- वडिलांना मारण्याचा कट रचल्याचे पियूला कळले. पतीचे त्याच्या चुलत भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचेही पियूला कळले.
पियू माहेरी आली… नंतर परतीची दारे झाली बंद!
२ ऑक्टोबर २०२३ रोजी पियू आई- वडिलांना भेटण्यासाठी माहेरी आली. परत जाण्यासाठी तिने पती व सासू, सासऱ्यांना कॉल केला असता ते म्हणाले, की तू आता इथे यायचे नाही. तू तुझ्या माहेरीच रहा, असे म्हणून त्यांनी कॉल कट केला व नंतर फोनच उचलले नाही. पियूला घेऊन तिचे वडील सासरी सोडण्यास गेले असता त्यांनी घरी येऊ न देता बाहेरच हॉटेलमध्ये भेटले. तिथे पियूच्याच चारित्र्यावर संशय घेऊन आम्ही तुमच्या मुलीला घरात घेणार नाही. तिला घरात घ्यायचे असेल तर १ कोटी रुपये द्या, अशी मागणी केली. त्यानंतर पियू व तिचे वडील परतले. तिचे कपडे, सर्व स्त्रीधन, महागडे सोन्याचे दागिने, रोख रक्कम पती व सासऱ्याच्या ताब्यात आहे. पियूने सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती व सासरच्यांविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मनिषा हिवराळे, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन राऊत करत आहेत.

