विद्यापीठातील लव्ह जिहादप्रकरणी अखेर नझीम पटेलविरुद्ध गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विद्यापीठातील लव्ह जिहादप्रकरणी अखेर पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून नराधम नझीम पटेल याच्याविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नझीम हा विद्यापीठात कंत्राटी कर्मचारी होता. या घटनेनंतर त्‍याची विद्यापीठ प्रशासनाने हकालपट्टी केली आहे. विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणात घेतलेल्या बोटचेप्या भूमिकेमुळे विद्यार्थी संतप्त झाले होते. नराधमाला पाठिशी घालण्याचे प्रयत्‍न विद्यापीठाच्या […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विद्यापीठातील लव्ह जिहादप्रकरणी अखेर पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून नराधम नझीम पटेल याच्याविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नझीम हा विद्यापीठात कंत्राटी कर्मचारी होता. या घटनेनंतर त्‍याची विद्यापीठ प्रशासनाने हकालपट्टी केली आहे. विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणात घेतलेल्या बोटचेप्या भूमिकेमुळे विद्यार्थी संतप्त झाले होते. नराधमाला पाठिशी घालण्याचे प्रयत्‍न विद्यापीठाच्या विशाला समितीकडून घडला होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केले होते.

काय आहे प्रकरण?
राष्ट्रीय सेवा योजनेचा राज्‍यस्‍तरीय उत्‍कर्ष विद्यापीठ महोत्‍सव यंदा जळगावला झाला. विद्यापीठाच्‍या संघात एका महाविद्यालयातील विद्यार्थिनीही जळगावला गेली होती. या संघासोबत गेलेल्या नझीम पटेल या कंत्राटी कर्मचाऱ्याने त्या विद्यार्थिनीवर लव्ह जिहादचे जाळे फेकले. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले होते. मात्र महोत्‍सव झाल्यावर सर्व विद्यार्थी घरी गेल्यावर नझीमने तिला व्हिडीओ कॉल करून लैंगिक छळ केला. ती जाळ्यात अडकत नसल्याचे पाहून तिचा छळ मांडला.

या छळाला कंटाळून तिने १६ मे रोजी विद्यापीठाकडे तक्रार केली. विद्यापीठाने ही तक्रार विशाखा समितीकडे पाठवली. मात्र समितीने विद्यार्थिनी संलग्नित कॉलेजची असून विद्यापीठाची नाहीये, असे कारण देत तक्रार निकाली काढली. यामुळे नझीमला एकप्रकारे अभय मिळाले होते. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिसांनी आता या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. पाठलाग करत व्हॉट्स अॅपवर व्हिडीओ कॉल करून त्रास दिल्याचे विद्यार्थिनीने तक्रारीत म्हटले आहे.

मद्यधुंद टवाळखोराची महिलांना शिवीगाळ
उत्तमनगरमध्ये धिंगाणा घालून मद्यधुंद अवस्थेत टवाळखोराने महिलांना आक्षेपार्ह इशारे करत शिवीगाळ केली. २१ ऑगस्ट रोजी रात्री नऊला हा प्रकार घडला. एका महिलेच्या तक्रारीवरून लतीफ हबीब कुरेशी (रा. गारखेडा) याच्याविरुद्ध जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वैजापूर तालुक्‍यात १६ वर्षीय मुलीचे इच्छेविरुद्ध लग्न, पतीकडून जबरदस्ती शारीरिक संबंध…
१६ वर्षीय मुलीची इच्छा नसतानाही तिच्या इच्‍छेविरोधात लग्न करून पतीने जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. या संबंधातून तिने बाळाला जन्म दिला. या प्रकरणात गुरुवारी (२२ ऑगस्ट) मुलीने वीरगाव पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीनुसार, मुलीच्या वडिलांनी तिच्या इच्छेविरुद्ध नगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील झरे काठी येथील एका तरुणाशी तिचे ११ जून २०२३ रोजी लग्न लावून दिले होते. त्यानंतर तिच्यासोबत पतीने जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. मुलीच्या तक्रारीवरून तिचे वडील, पती, सासू आणि सासऱ्याविरोधात वीरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास फौजदार मनीषा जगताप करीत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चक्रावणारी घटना, दोन मित्र, कार, महिला, तिचे मित्र अन्‌ लूट... जयभवानीनगर ते सिडको चौकापर्यंत ते घडलं ते अचंबित करणारे... कसं घडलं ते विस्ताराने वाचा...

Latest News

चक्रावणारी घटना, दोन मित्र, कार, महिला, तिचे मित्र अन्‌ लूट... जयभवानीनगर ते सिडको चौकापर्यंत ते घडलं ते अचंबित करणारे... कसं घडलं ते विस्ताराने वाचा... चक्रावणारी घटना, दोन मित्र, कार, महिला, तिचे मित्र अन्‌ लूट... जयभवानीनगर ते सिडको चौकापर्यंत ते घडलं ते अचंबित करणारे... कसं घडलं ते विस्ताराने वाचा...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पुंडलिकनगर पोलिसांपुढे रविवारी (८ मार्च) एक विचित्र, रहस्यमयी घटना आली. एका ३९ वर्षांच्या पुरुषाने...
घर बांधणाऱ्या ठेकेदाराने कमालच केली, अर्धवट बांधकाम करून गेटला लावले स्वतःचे कुलूप!; दाम्पत्य हैराण-परेशान... मुकुंदवाडी पोलिसांत धाव!!
चोरट्यांनी हद्दच केली... चक्क न्यायाधीशांच्या बंगल्यावर डल्ला; सिडको एन ३ मधील घटना
सिडको बसस्थानक-हर्सूल रस्त्यावर सुसाट ब्रेझा कारचा थरार; आधी रिक्षा, नंतर दुचाकीला उडवले, केटररर्स व्यावसायिकाचा मृत्यू, रिक्षाचालक जखमी
इमर्जन्सीसाठी पेट्रोल, डिझेलचा साठा राखीव ठेवा, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे सर्व इंधन विक्री कंपन्यांना आदेश
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software