विठ्ठलनगर, रामनगरात टवाळखोरांचा धुडगूस!; लाठ्याकाठ्यांनी वाहनांची तोडफोड, मुलींना पाहून शेरेबाजी, पोलिसांसाठी ‘अदखलपात्र’ ठरणाऱ्या प्रकारांमुळे नागरिक दहशतखाली!!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाणे सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी दोन लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायांचा पर्दाफाश नागरिकांनाच करावा लागला होता. अवैध धंदे, नशेखोरीतून गुन्हेगारी कृत्‍ये, टवाळखोरांचा उच्छाद यामुळे नागरिक दहशतीखाली आले आहेत. रविवारी (१३ जुलै) पहाटे अडीचला विठ्ठलनगर, प्रकाशनगरात टवाळखोरांनी कहरच केला. मुख्य रस्‍त्‍यावर धिंगाणा घालत तान्हाजीनगरमध्ये जाऊन […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाणे सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी दोन लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायांचा पर्दाफाश नागरिकांनाच करावा लागला होता. अवैध धंदे, नशेखोरीतून गुन्हेगारी कृत्‍ये, टवाळखोरांचा उच्छाद यामुळे नागरिक दहशतीखाली आले आहेत.

रविवारी (१३ जुलै) पहाटे अडीचला विठ्ठलनगर, प्रकाशनगरात टवाळखोरांनी कहरच केला. मुख्य रस्‍त्‍यावर धिंगाणा घालत तान्हाजीनगरमध्ये जाऊन विक्रमादित्य शाळेसमोर वाहनांवर लाठ्याकाठ्या, दगडांनी ६ ते ७ वाहनांची तोडफोड केली. नागरिकांनी एकत्र येऊन त्‍यांना पकडण्याचा प्रयत्‍न केला, मात्र त्‍यांनी पळ काढला. पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करून सोमवारी (१४ जुलै) नागरिकांना परतवून लावल्याचे सांगण्यात आले.

नागरिक सोमवारी सायंकाळी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यावर धडकले होते. त्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांनी घटनास्थळी पाहणीही केली. नशेखोरांनी शनिवारी रात्रीही प्रकाशनगरमध्ये वाहनांची तोडफोड केली होती. या भागात शाळा, क्‍लासेससमोर नशेखोर दिवसा थांबून मुलींन पाहून अश्लील शेरेबाजी करतात, गाणी म्‍हणतात. त्‍यामुळे मुलीही धास्तावल्या असून, भयंकर काही घडण्याआधी पोलिसांनी नशेखोरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अनेक दिवसांपासून नशेखोरांचा त्रास नागरिकांना वाढला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सोमवारी सकाळीही एका नशेखोराने भाजी विक्रेत्याला चाकूचा धाक दाखवून पैसे मागितले.

अभय का मिळतेय?
नशेखोरांचा बंदोबस्त करणे पोलिसांसाठी अवघड नाही. मग पोलीस गांभीर्याने या गोष्टी का घेत नाहीत, तोडफोड, मुलींची छेडछाड, शांतता भंग करणे अशा गोष्टी घडत असताना आणि विशेष म्‍हणजे नागरिकांनी लेखी तक्रार केली असतानाही पोलीस नशेखोरांना का अभय देत आहेत, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. यात पोलीस अधीक्षक प्रवीण पवार यांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता

Latest News

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज, ३१ जुलैला निकाल दिला आहे. १७ वर्षांनंतर...
घरी बसून करा हजारो रुपयांचे मोफत फेशियल!; सगळे तुम्हाला विचारतील, तुमच्या चमकत्या त्वचेचे रहस्य काय?
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
रत्नाकर फायनान्समधून महिलांना अश्लील कॉल!; जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, कसे येतात कॉल, कुठून मिळवतात नंबर, जाणून घेऊ...
मोबदला न देता मालमत्ता पाडाल तर सामूहिक आत्‍मदहन करू!;  हर्सूलवासियांचा पवित्रा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software