वाकडीतिकडी सुसाट आलेल्या दुचाकीने १७ वर्षीय तरुणीला उडवले, दूरवर फेकली गेल्याने जखमी, बजाजनगरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव, पण वेडीवाकडी येत असलेल्या मोटारसायकलीने पायी निघालेल्या १७ वर्षीय तरुणीला उडवले. यात तरुणी जखमी झाली आहे. ही घटना बजाजनगरातील गरुडझेप अकॅडमी ते राजे शिवाजी महाविद्यालयाच्या रोडवर शुक्रवारी (६ जून) सकाळी ११ च्या घडली. ऋतुजा दीपक डुंबरे (वय १७, रा. तिरंगा कॉलनी पंढरपूर, वाळूज एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर) या तरुणीने याप्रकरणात […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव, पण वेडीवाकडी येत असलेल्या मोटारसायकलीने पायी निघालेल्या १७ वर्षीय तरुणीला उडवले. यात तरुणी जखमी झाली आहे. ही घटना बजाजनगरातील गरुडझेप अकॅडमी ते राजे शिवाजी महाविद्यालयाच्या रोडवर शुक्रवारी (६ जून) सकाळी ११ च्या घडली.

ऋतुजा दीपक डुंबरे (वय १७, रा. तिरंगा कॉलनी पंढरपूर, वाळूज एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर) या तरुणीने याप्रकरणात तक्रार दिली आहे. तिच्यावर सध्या बजाजनगरच्या घृष्णेश्वर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. ती आई-वडील व बहिणीसह राहते. १२ वीच्या विज्ञान शाखेत एस. बी. कॉलेजमध्ये शिकते. शुक्रवारी (६ जून) सकाळी ११ च्या सुमारास ऋतुजा, तिची आई आणि छोटी बहीण प्राची अशा तिघी अॅडमिशन घेण्यासाठी राजे शिवाजी महाविद्यालयाकडे जात होते. गरुडझेप अकॅडमी ते राजे शिवाजी महाविद्यालय येथे पायी मधल्या रस्त्याने जात असताना मागून एक काळी मोटारसायकल भरधाव आली.

दोघे व्यक्‍ती वेडीवाकडी चालवत व कट मारत आले व ऋतुजाला मागून उडवले. ऋतुजा दूरवर पडल्याने तिच्या डोक्याला, कपाळावर मार लागल्याने ती बेशुध्द पडली. तिच्या आई व बहिणीने आरडा ओरड केल्याने लोक जमले. लोकांच्या मदतीने ऋतुजाला घृष्णेश्वर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथील मुलांच्या मदतीने तिने मोटारसायकल चालकाचा व गाडीचा फोटो घेतला. त्या मोटारसायकलचा नंबर MH 20 CL 8247 असल्याचे समोर आले. ऋतुजाच्या तक्रारीवरून पोलिसांनी या मोटारसायकलील दोन्ही मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सुरेश तारव करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 

Latest News

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना  पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...
शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना
कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software