भाजप पदाधिकाऱ्यांतच रंगले बॅनर वॉर; भाजपचे युवा नेते कुणाल मराठेंविरुद्ध गुन्हा दाखल, भाजपच्याच मंडळ सरचिटणीसाची क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांतच बॅनरवॉर रंगले आहे. यातून भाजपचे युवा नेते कुणाल मराठे यांच्याविरुद्ध भाजप गुलमंडी मंडळाच्या सरचिटणीसाने क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यावरून पोलिसांनी कुणाल मराठे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महेश मोहनलाल मल्लेकर (वय ३२, रा. अभयपुत्र कॉलनी, समतानगर, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांतच बॅनरवॉर रंगले आहे. यातून भाजपचे युवा नेते कुणाल मराठे यांच्याविरुद्ध भाजप गुलमंडी मंडळाच्या सरचिटणीसाने क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यावरून पोलिसांनी कुणाल मराठे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महेश मोहनलाल मल्लेकर (वय ३२, रा. अभयपुत्र कॉलनी, समतानगर, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते गुलमंडी मंडळाचे सरचिटणीस आहेत. तक्रारीत म्‍हटले आहे, की ३ ऑक्‍टोबरला दुपारी ४ च्या सुमारास त्‍यांना कळले, की कोटला कॉलनी, पाण्याच्या टाकीशेजारी हर्षवर्धन कराड मित्रमंडळातर्फे लावलेले नवरात्री उत्सवाचे शुभच्छा बॅनर कुणाल मराठे यांनी काढले. त्‍यामुळे महेश मल्लेकर, पवन सोनवणे, सागर विसपुते, स्वराज दहिवाल असे कोटला कॉलनीत गेले.

तिथे हर्षवर्धन कराड मित्रमंडळाचे शुभेच्छाचे बॅनर काढून कुणाल मराठे यांनी स्वत:च्या नावाचे बॅनर लावलेले होते. त्‍यावर मल्लेकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी कुणाल मराठे यांना तू हर्षवर्धन कराड मित्रमंडळाचे बॅनर का काढले, असे विचारले. त्यावर मराठे म्‍हणाले, की मला विचारल्याशिवाय तुम्ही याठिकाणी बॅनर कसे लावले. त्यावर मल्लेकर यांनी वैभव राऊत यांच्याशी बोलणे झाले असून त्यांनी बॅनर लावण्यास सांगितले आहे, असे सांगितले.

यावेळी कुणाल मराठे यांच्यासोबत मल्लेकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांचा वाद झाला. काही वेळाने मल्लेकर आणि मुजाहिद नासेर खान, बंटी चावरिया असे पुन्हा तिथे बॅनर लावण्यासाठी गेले. त्यावेळी कुणाल मराठे यांनी शिवीगाळ केल्याचे तक्रारीत मल्लेकर यांनी म्‍हटले आहे. त्यानंतर मल्लेकर आणि सहकाऱ्यांनी त्‍याठिकाणी हर्षवर्धन कराड मित्र मंडाळचे बॅनर लावून घेतले.

कुणाल मराठेंनी इन्स्टावर टाकला व्हिडीओ…
मल्लेकर यांच्या तक्रारीनुसार, काही वेळाने त्यांना इन्स्टाग्रामवर कुणाल मराठे यांनी टाकलेला व्हिडीओ दिसला. त्‍यात मराठे यांनी खा. डॉ. भागवत कराड यांच्या गुंडांनी येऊन याठिकाणी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला व बॅनर लावले, असा पोस्टमध्ये म्हटले होते. द्वेष पसरविण्याच्या उ‌द्देशाने करणारे वक्तव्य व खा. डॉ. भागवत कराड यांची बदनामी केल्याचे मल्लेकर यांनी तक्रारीत म्‍हटले आहे. त्‍यावरून पोलिसांनी मराठे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील माने करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!

Latest News

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली! ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मधील रहिवासी अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून...
एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!  
जाधववाडीत २३ वर्षीय तरुणाची आत्‍महत्‍या, प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल : पोलीस सूत्र
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software