बारावीच्या मुलीला तो मेसेज धडकला अन्‌…; वेदांतनगर पोलिसांची समयसूचकता आली कामी!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बारावीत शिकणाऱ्या मुलीला आत्‍महत्‍येसाठी जात असल्याचा मेसेज वडिलांनी केला अन्‌ ती भांबावून गेली… तिने तातडीने पोलिसांना मदतीसाठी विनवणी केली. वेदांतनगर पोलिसांनीही तातडीने प्रतिसाद देत सूत्रे हलवली अन्‌ जीव देण्यासाठी निघालेल्या तिच्या वडिलांचे प्राण वाचवले! ही घटना सोमवारी (१ जुलै) साडेतीनच्या सुमारास घडली. कंपनीतील नोकरी १५ दिवसांपूर्वी गेली. घरातील कुरबुरी वाढल्या. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बारावीत शिकणाऱ्या मुलीला आत्‍महत्‍येसाठी जात असल्याचा मेसेज वडिलांनी केला अन्‌ ती भांबावून गेली… तिने तातडीने पोलिसांना मदतीसाठी विनवणी केली. वेदांतनगर पोलिसांनीही तातडीने प्रतिसाद देत सूत्रे हलवली अन्‌ जीव देण्यासाठी निघालेल्या तिच्या वडिलांचे प्राण वाचवले! ही घटना सोमवारी (१ जुलै) साडेतीनच्या सुमारास घडली.

कंपनीतील नोकरी १५ दिवसांपूर्वी गेली. घरातील कुरबुरी वाढल्या. या तणावातून बजाजनगरजवळील वडगाव कोल्हाटी येथील गट नं. ६, जीवननगर भागातील ४२ वर्षीय व्यक्‍तीने मुलीला आत्‍महत्‍येसाठी रेल्वेस्टेशनला जात असल्याचा मेसेज केला. वडील घरी नसल्याने मुली घाबरून गेली.

तातडीने कुटुंबीयांनी वेदांतनगर पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी तांत्रिक तपास करत अवघ्या अर्ध्या तासात या व्यक्तीला शोधून आत्‍महत्‍येपासून परावृत्त केले. हा व्यक्‍ती एका कंपनीत नोकरीला होता. पत्नी व दोन मुलींसह राहतो. पोलिसांनी समुपदेशन करून सर्वांना घरी पाठविल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांनी पत्रकारांना दिली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 

Latest News

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना  पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...
शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना
कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software