परस्‍त्रीच्या नादात बायकोला सोडले, आता हर्सूल पोलीस घडवणार अद्दल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : परस्‍त्रीच्या नादाला लागून एकाने बायकोला सोडून दिले. परस्‍त्रीसोबत बायकोच्या संमतीविनाच लग्नही केल्याचेही नंतरच्या काळात समोर आले. त्‍यामुळे विवाहितेने हर्सूल पोलीस ठाण्यात धाव घेऊन शनिवारी (१८ जानेवारी) तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हर्सूलच्या बेरीबागमध्ये राहणाऱ्या ३१ वर्षीय महिलेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तिचे लग्न १२ […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : परस्‍त्रीच्या नादाला लागून एकाने बायकोला सोडून दिले. परस्‍त्रीसोबत बायकोच्या संमतीविनाच लग्नही केल्याचेही नंतरच्या काळात समोर आले. त्‍यामुळे विवाहितेने हर्सूल पोलीस ठाण्यात धाव घेऊन शनिवारी (१८ जानेवारी) तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हर्सूलच्या बेरीबागमध्ये राहणाऱ्या ३१ वर्षीय महिलेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तिचे लग्न १२ मे २०१८ रोजी झाले होते. तिचा पती खासगी कंपनीत नोकरी करतो. लग्नानंतर पाच- सहा महिने तिला पतीने चांगले वागविले. त्यानंतर शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ करण्यास सुरुवात केली. तुझ्या आई- वडिलांकडून फोरव्हिलर घेण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी सुरू केली. तिला पतीपासून २२ फेब्रुवारी २०१९ रोजी मुलगा झाला. आता तिचा मुलगा ६ वर्षांचा आहे. याचदरम्यान तिच्या पतीचे परस्‍त्रीसोबत अनैतिक संबंध निर्माण झाले. ८ सप्‍टेंबरला त्याने तिला घरात बेदम मारहाण करून घरातून निघून गेला. त्यानंतर त्याने प्रेयसीसोबत लग्न केले, असे विवाहितेने तक्रारीत म्‍हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार निर्मला कोलते करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!

Latest News

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ! State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...
State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!
कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली
विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software