पडेगाव रोडवरील आणखी २७२ अतिक्रमणे हटवली, आज-उद्या कारवाईला ब्रेक, सोमवारी जळगाव रोडकडे वळणार बुलडोझर

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने शुक्रवारी (४ जुलै) पडेगाव रोडवर दिवसभरात २७२ अतिक्रमणांवर बुलडोझर चालवला. गुरुवारी ५८५ अतिक्रमणे काढली होती. आता रस्ता पूर्णपणे २०० फूट रुंद झाला असून, आज, उद्या (५ व ६ जुलै) कारवाईला ब्रेक देण्यात आला असून, या दोन दिवसांत जळगाव रोडवरील अतिक्रमणधारकांना अतिक्रमणे काढून घेण्यास संधी मिळाली आहे. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने शुक्रवारी (४ जुलै) पडेगाव रोडवर दिवसभरात २७२ अतिक्रमणांवर बुलडोझर चालवला. गुरुवारी ५८५ अतिक्रमणे काढली होती. आता रस्ता पूर्णपणे २०० फूट रुंद झाला असून, आज, उद्या (५ व ६ जुलै) कारवाईला ब्रेक देण्यात आला असून, या दोन दिवसांत जळगाव रोडवरील अतिक्रमणधारकांना अतिक्रमणे काढून घेण्यास संधी मिळाली आहे. सोमवारी (७ जुलै) जळगाव रोडकडे बुलडोझरची तोंडे फिरणार आहेत.

शनिवारी मोहरम, रविवारी आषाढी एकादशी आहे. त्‍यामुळे पोलीस बंदोबस्त लागणार असल्याने पोलिसांच्या सूचनेनुसार, महापालिकेने आज, उद्या कारवाई थांबवली. पडेगाव ते दौलताबाद टी पॉईंट हा राज्य महामार्ग आहे. महापालिकेच्या हद्दीत या रस्त्याची रुंदी विकास आराखड्यानुसार ६० मीटर आहे. सध्या हा रस्ता ३० मीटर रूंद असून, उर्वरित ३० मीटर अंतरात पडेगाव आणि मिटमिटा येथे अतिक्रमणे झाली होती. शुक्रवारी सकाळी मिटमिट्याच्या पुढे कारवाईला सुरुवात करण्यात आली. सायंकाळपर्यंत २७२ अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी कारवाईची पाहणी केली. महापालिकेचे ३५०, पोलिसांचे २५० अधिकारी, कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते.

जळगाव रोडवरील अतिक्रमणधारक धास्तावले…
सोमवारी जळगाव रोडवरील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. हा रस्ता ६० मीटर रूंद करण्यात येणार आहे. शुक्रवारी काळा गणपती मंदिरासमोर भीषण अपघात घडल्यानंतर महापालिकेने जळगाव रोड आता कारवाईसाठी निवडल्याचे सूत्रांनी सांगितले. शनिवार, रविवार त्‍यांना अतिक्रमणे काढून घेण्याची संधी मिळाली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता

Latest News

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज, ३१ जुलैला निकाल दिला आहे. १७ वर्षांनंतर...
घरी बसून करा हजारो रुपयांचे मोफत फेशियल!; सगळे तुम्हाला विचारतील, तुमच्या चमकत्या त्वचेचे रहस्य काय?
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
रत्नाकर फायनान्समधून महिलांना अश्लील कॉल!; जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, कसे येतात कॉल, कुठून मिळवतात नंबर, जाणून घेऊ...
मोबदला न देता मालमत्ता पाडाल तर सामूहिक आत्‍मदहन करू!;  हर्सूलवासियांचा पवित्रा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software