नादुरुस्त कंटेनर रस्त्यातच, मागून १ ट्रक, २ ट्रॅव्हल्स येऊन थांबल्या, तिसऱ्या ट्रॅव्हल्सने दिली धडक, सर्व गाड्या एकमेकींवर मागून धडकल्या, तरुणी जखमी, शेंद्रा परिसरातील जालना रोडवरील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बंद पडलेल्या कंटेनरवर मागून तीन ट्रॅव्हल्स बस येऊन धडकल्या. यात एका ट्रॅव्हल्स बसमधील नागपूरहून पुण्याला जाणारी तरुणी जखमी झाली. अपघाताची नोंद चिकलठाणा पोलिसांनी घेतली आहे. घटना शनिवारी (१७ ऑगस्ट) मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर- जालना रोडवर शेंद्रा परिसरात घडली. जालना रस्त्यावर कंटेनर नादुरुस्त असल्यामुळे थांबला होता. तो रस्त्याच्या बाजूला घेण्याची […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बंद पडलेल्या कंटेनरवर मागून तीन ट्रॅव्हल्स बस येऊन धडकल्या. यात एका ट्रॅव्हल्स बसमधील नागपूरहून पुण्याला जाणारी तरुणी जखमी झाली. अपघाताची नोंद चिकलठाणा पोलिसांनी घेतली आहे. घटना शनिवारी (१७ ऑगस्ट) मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर- जालना रोडवर शेंद्रा परिसरात घडली.

जालना रस्त्यावर कंटेनर नादुरुस्त असल्यामुळे थांबला होता. तो रस्त्याच्या बाजूला घेण्याची गरज असताना चालकाने मेकॅनिकच्या बाजूने तिथेच ट्रक दुरुस्तीचा प्रयत्‍न सुरू केला. त्याचवेळी मागून आलेला दुसरा एक ट्रक सुरक्षित अंतरावर येऊन थांबला. त्यानंतर काही वेळाने त्याच्यामागे बाबा ट्रॅव्हल्सची गाडी येऊन थांबली. त्याच्या मागेच संगीतम ट्रॅव्हल्सच्या दोन गाड्या होत्या. त्यातील एक गाडी बाबा ट्रॅव्हल्सवर आदळली. त्यामुळे बाबा ट्रॅव्हल्सची गाडी ट्रकवर जाऊन आदळली. त्याचवेळी शेवटची गाडीही या गाड्यांवर आदळली.

या अपघातात बाबा ट्रॅव्हल्सच्या गाडीचे मागून पुढून नुकसान झाले. ट्रॅव्हल्समधील नेहा नीलेश राकडे (रा. मानेवाडा, जि. नागपूर) या तरुणीच्या मानेला धक्का बसल्याने ती जखमी झाली. तिच्यावर शहरात उपचार केल्यानंतर पुण्याला नातेवाइक डॉक्टरांकडे हालविण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रविकिरण दरवाडे यांनी दिली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने पोलीस ठाण्यात जमा केली आहेत. अपघातानंतर तिन्ही वाहने रस्त्याच्या मधोमध असल्याने जालन्याकडून येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. चिकलठाणा पोलिसांनी वेळीच धाव घेऊन वाहतूक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने वळवली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 

Latest News

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना  पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...
शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना
कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software