टाटा सुमोतून १० जण आले, दोघांची घरात घुसून महिलेला मारहाण, तिला व तिच्या पतीला किडनॅप करण्याची धमकी!; सातारा परिसरातील थरार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : टाटा सुमोतून आलेल्या ८ ते १० जणांनी महिलेच्या घरासमोर गाडी उभी करून दोघे घरात घुसले. त्‍यांनी महिलेला मारहाण करत तिला व तिच्या पतीला किडनॅप करून जीवे मारण्याची धमकी दिली. सातारा पोलिसांनी या प्रकरणात शनिवारी (२७ जुलै) गुन्हा दाखल करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. ही घटना बीड बायपास भागातील इटखेड्यातील […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : टाटा सुमोतून आलेल्या ८ ते १० जणांनी महिलेच्या घरासमोर गाडी उभी करून दोघे घरात घुसले. त्‍यांनी महिलेला मारहाण करत तिला व तिच्या पतीला किडनॅप करून जीवे मारण्याची धमकी दिली. सातारा पोलिसांनी या प्रकरणात शनिवारी (२७ जुलै) गुन्हा दाखल करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. ही घटना बीड बायपास भागातील इटखेड्यातील एकतानगरात शुक्रवारी (२६ जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

रुबीना शेरु पठाण (वय ३७, रा. रा. इटखेडा, एकतानगर, बीड बायपास) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. शुक्रवारी घरी असताना रात्री साडेनऊच्या सुमारास पांढरी टाटा सुमो त्‍यांच्या घरासमोर येऊन थांबली. त्‍यातून ८ ते १० उतरले. पैकी तीन ते चार लोक बळजबरी रुबिनाच्या घरात घुसले. तुम्ही कोण आहात, आमच्या घरात कशाला आलात, असे त्यांना विचारत असताना एकाने रुबिनाच्या गालात चापट मारली. तिने आरडाओरड सुरू केली असता तिची मुले धावत आली. त्‍यामुळे घरात घुसलेले लोक बाहेर पळून उभ्या गाडीजवळ ते गेले. महिलेने तिच्या पतीला कॉल केला. त्यावेळी ते लोक म्हणाले, तुझ्या नवऱ्याला बोलावून घे. त्याला सांग शोएब, आहाद (रा. कन्‍नड) त्याला मारण्यासाठी आले आहेत.

हिंमत असेल तर घरी ये, असे म्हणून ते शिवीगाळ करू. तुला व तुझ्या नवऱ्याला किडनॅप करून घेऊन जाऊ, मारून टाकू, अशी धमकी ते देऊ लागले. त्‍यामुळे रुबिनाने घराचा दरवाजा बंद करून घेतला. थोड्या वेळाने ते तिथून निघून गेले. त्यानंतर रुबिना सातारा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आली. पोलिसांनी तिला मेडिकल मेमो देऊन घाटी रुग्णालयात पाठवले. उपचार घेऊन ती घरी आली. तिचे पती हिंगोलीवरून घरी आल्यावर दोघांनी मिळून सातारा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्‍यांचा शोध घेतला जात आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप बचाटे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software