जटवाडा परिसरातील तलावात आढळला १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जटवाडा परिसरातील समृद्धी महामार्गालगतच्या तलावात १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह सोमवारी (१९ ऑगस्ट) सायंकाळी साडेपाचला आढळल्यानंतर खळबळ उडाली. सपना ज्ञानेश्वर चव्हाण असे मृतदेह आढळलेल्या तरुणीचे नाव आहे. चव्हाण कुटुंब जटवाड्यातील चिमणपूरवाडी परिसरात वास्तव्यास आहे. सपना अकरावीत शिकत होती. ती सोमवारी सकाळपासून बेपत्ता होती. कुटुंबाने तिचा शोध घेऊनही ती मिळून आली नाही. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जटवाडा परिसरातील समृद्धी महामार्गालगतच्या तलावात १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह सोमवारी (१९ ऑगस्ट) सायंकाळी साडेपाचला आढळल्यानंतर खळबळ उडाली.

सपना ज्ञानेश्वर चव्हाण असे मृतदेह आढळलेल्या तरुणीचे नाव आहे. चव्हाण कुटुंब जटवाड्यातील चिमणपूरवाडी परिसरात वास्तव्यास आहे. सपना अकरावीत शिकत होती. ती सोमवारी सकाळपासून बेपत्ता होती. कुटुंबाने तिचा शोध घेऊनही ती मिळून आली नाही. तिचे काका तलाव परिसरात शोध घेत असताना त्‍यांना तलावाबाहेर चपला दिसल्या. त्यांनी तत्काळ हर्सूल पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली. अग्‍निशमन विभागाला कळविण्यात आले. अग्‍निशमन दलाच्या जवानांनी तलावात शोध घेत सपनाचा मृतदेह बाहेर काढला. तिचे आत्‍महत्‍या केली की अपघाताने तिचा मृत्‍यू झाला, हे अद्याप समोर आलेले नाही. हर्सूल पोलीस तपास करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!

Latest News

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ! State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...
State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!
कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली
विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software