छत्रपती संभाजीनगरात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्‍महत्‍या

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने राहत्‍या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिडको एन- ५ भागातील साईनगरमध्ये बुधवारी (४ डिसेंबर ) सकाळी साडेदहाच्या सुमारास समोर आली. शुभमभाऊ ज्ञानेश्वर वहाटुळे (वय २१, रा. पिंपळगाव वळण, ता. फुलंब्री) असे त्‍याचे नाव आहे. शुभम इलेक्ट्रिकल शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. साईनगरमध्ये किरायाने खोली घेऊन राहत होता. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने राहत्‍या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिडको एन- ५ भागातील साईनगरमध्ये बुधवारी (४ डिसेंबर ) सकाळी साडेदहाच्या सुमारास समोर आली. शुभमभाऊ ज्ञानेश्वर वहाटुळे (वय २१, रा. पिंपळगाव वळण, ता. फुलंब्री) असे त्‍याचे नाव आहे.

शुभम इलेक्ट्रिकल शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. साईनगरमध्ये किरायाने खोली घेऊन राहत होता. सकाळी साडेदहाच्या सुमारास खोलीत त्‍याने गळफास घेतला. हा प्रकार त्याच्या शेजारी राहणाऱ्या भाडेकरू व घरमालकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सिडको पोलिसांना कळवले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही. सिडको पोलिस तपास करत आहेत. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास त्‍याचा मोठा भाऊ गावाकडून शहरात आला होता.

त्‍याने आईने दिलेला डबा शुभमला दिला. मला गावाकडे तुझ्या दुचाकीवरून यायचे आहे, असे त्‍याने भावाला सांगितले. मी शहरातील कामे आटोपून आल्यानंतर गावी जाऊ, असे सांगून मोठा भाऊ निघून गेला होता. शुभम अभ्यासात हुशार होता. शुभमचे वडील अल्‍पभूधारक असून, त्‍यांना तीन मुले आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी त्‍यांनी घरही बांधले नाही. शुभम शिक्षण घेत असतानाच वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत कामालाही जात होता.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...
खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
'वाईट कमेंट वाचून त्यांना फटकारावेसे वाटत होते...; अभिनेत्री नेहा धुपियाची विशेष मुलाखत
Business News : भाजी विक्रेत्याने जिंकली ११ कोटींची पंजाब राज्य लॉटरी, त्याला किती उत्पन्न कर भरावा लागेल?
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software