चारित्र्यावर संशय घेऊन विवाहित तरुणीचा छळ; सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल, नारेगावची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मुलगी झाली म्हणून चारित्र्यावर संशय घेऊन २१ वर्षीय विवाहितेचा पती व सासरच्यांनी छळ मांडला. घरातून हाकलून दिले. विवाहिता वर्षभरापासून माहेरी राहते. विनंत्‍या करूनही नांदवायला नेत नसल्याने अखेर तिने सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी (८ जुलै) पती व सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्‍यातील […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मुलगी झाली म्हणून चारित्र्यावर संशय घेऊन २१ वर्षीय विवाहितेचा पती व सासरच्यांनी छळ मांडला. घरातून हाकलून दिले. विवाहिता वर्षभरापासून माहेरी राहते. विनंत्‍या करूनही नांदवायला नेत नसल्याने अखेर तिने सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी (८ जुलै) पती व सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

छत्रपती संभाजीनगर तालुक्‍यातील पांढरी पिंपळगाव येथील २१ वर्षीय तरुणीचे लग्न नारेगावच्या शिवाजी पुतळ्याजवळ जोशी गल्लीतील २७ वर्षीय तरुणासोबत ७ फेब्रुवारी २०२३ रोजी झाले होते. तिचे वडील चहा-नाश्त्याची हॉटेल चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सासरच्यांनी तिला पाच- सहा महिने चांगली वागणूक दिली. नंतर लग्नाच्या एक वर्षाच्या आत तिला मुलगी झाली. तेव्हा सासू, भाया व जाऊ यांनी मुलगी झाली म्हणून वाईट वागणूक द्यायला सुरुवात केली.

मुलगीच झाली, मुलगा झाला नाही असे म्हणून विवाहितेला त्रास देत तिच्याविरुद्ध तिच्या नवऱ्याला काहीतरी सांगून मारहाण करण्यास सांगायचे. त्यांचे ऐकून नवरा तिला मारहाण करायचा. तिच्यावर कुणालातरी बोलते असा संशय नवरा घ्यायचा. त्यानंतर सासू, भाया व नवरा हे आपल्याला घर बांधायचे आहे. तू तुझ्या आई-वडिलांकडून पैसे आण म्हणून मानसिक व शारीरिक त्रास देत होते. अपमानास्पद वागणूक देऊन तिला घरातून काढून दिले. वर्षभरापासून ती माहेरी राहत आहे. अखेर तिने पोलिसांत तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार शांतीलाल जसवाल करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 

Latest News

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना  पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...
शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना
कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software