- Marathi News
- सिटी क्राईम
- गुन्हेगारांना चटईवर बसवून शहर पोलिसांची ‘नम्र’ विनंती!; ‘लातो’ के भूत ‘बातों’ से मानणार?
गुन्हेगारांना चटईवर बसवून शहर पोलिसांची ‘नम्र’ विनंती!; ‘लातो’ के भूत ‘बातों’ से मानणार?
On
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील ड्रग्जच्या रॅकेटची पाळेमुळे खोदण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. शहर-जिल्ह्यातील साडेतीन लाखांहून अधिक वाचक असलेल्या छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूजनेही यात सहभाग देत प्रत्येक बातमीत अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन ‘जनहितार्थ जाहिराती’द्वारे केले आहे. सोमवारी (५ ऑगस्ट) शहर पोलिसांनी आणखी एक पाऊल टाकत अशा गुन्हेगारांची परेड घेतली. […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील ड्रग्जच्या रॅकेटची पाळेमुळे खोदण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. शहर-जिल्ह्यातील साडेतीन लाखांहून अधिक वाचक असलेल्या छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूजनेही यात सहभाग देत प्रत्येक बातमीत अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन ‘जनहितार्थ जाहिराती’द्वारे केले आहे. सोमवारी (५ ऑगस्ट) शहर पोलिसांनी आणखी एक पाऊल टाकत अशा गुन्हेगारांची परेड घेतली. ड्रग्ज रॅकेटमध्ये सक्रीय असण्याची शक्यता असलेल्या आणि गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पोलीस आयुक्तालयाच्या मैदानावर बोलाविण्यात आले होते. चटईवर बसवून त्यांना ड्रग्जची विक्री न करण्याचे ‘नम्र’ आवाहन करण्यात आले.
शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील १७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ८९ गुन्हेगार मिटिंगसाठी हजर होते. टॉप २५ गुन्हेगारांपैकी १० जण आले होते. ९ जण वेगवेगळी कारणे देत येऊ शकले नाहीत. ६ जण कारागृहात आहेत. मिटिंगला आलेल्या सर्वांकडून नाव, मोबाइल क्रमांक, नातेवाइकांची नावे, त्यांचे मोबाइल क्रमांक, निवास पत्ता, किती गुन्हे दाखल आहेत, असा अर्ज भरून घेण्यात आला. सर्वांचे समोरून आणि दोन्ही बाजूंनी चेहऱ्याचे फोटो काढण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक आयुक्त धनंजय पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, एनडीपीएस पथकाच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी सर्व पाहुण्यांना सध्या तरी इशाऱ्यातून समजावले आहे.
ड्रग्जची पाळेमुळे खोदायची असतील तर केवळ रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या भरवशावर न बसता कारवाईला व्यापक स्वरुप देण्याची गरज आहे. शहरातील अनेक प्रसिद्ध, मोठ्या हॉटेल्स, बारमध्ये होणाऱ्या पार्ट्यांत केली जाणारी नशाही टार्गेटवर आणण्याची गरज आहे. रविवारी फ्रेंडशीप डेनिमित्त शहरातील अनेक मोठ्या हॉटेल्स, बारमध्ये पार्ट्यांचे आयोजन केले होते. या पार्ट्यांत अनेक जण ड्रग्जच्या नशेत झिंगल्याची चर्चा आहे. मात्र स्थानिक पोलीस किंवा एनडीपीएस पथकाला कानोकान खबर नव्हती.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्यू, पैठणची घटना
By City News Desk
अनोळखी पुरुषाकडून लिफ्ट घेणे महिलेला पडले महागात, वाळूजजवळ काय घडलं...
By City News Desk
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
By City News Desk
Latest News
31 Jul 2025 19:19:25
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाल्याचा संदेश लवकरच त्यांच्या...