क्‍विक स्टार्ट २४ ग्रुपचे संचालक गांधी, शहांनी ६ महिन्यांपूर्वी सोडला देश!, छत्रपती संभाजीनगर ३५ कोटी घोटाळा प्रकरण

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या दीड हजार गुंतवणूकदारांना ३५ कोटी रुपयांचा चुना लावून गुजरातच्या क्विक स्टार्ट २४ ग्रुप कंपनीचे मुख्य संचालक व आरोपी हर्षल योगेश गांधी आणि प्रतीक एम. शहा (दोघेही रा. अहमदाबाद) सहा महिन्यांपूर्वीच देश सोडून अरब देशात पसार झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी इमिग्रेशनला त्यांच्याबाबत ई- मेलद्वारे पत्रव्यवहार […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या दीड हजार गुंतवणूकदारांना ३५ कोटी रुपयांचा चुना लावून गुजरातच्या क्विक स्टार्ट २४ ग्रुप कंपनीचे मुख्य संचालक व आरोपी हर्षल योगेश गांधी आणि प्रतीक एम. शहा (दोघेही रा. अहमदाबाद) सहा महिन्यांपूर्वीच देश सोडून अरब देशात पसार झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी इमिग्रेशनला त्यांच्याबाबत ई- मेलद्वारे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर चोवीस तासांत त्यांच्या विरोधात लुक आउट नोटीस जारी झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.

गुंतवणुकीच्या रकमेवर दरमहा ३ टक्के परतावा, विदेशवारी व महागड्या बक्षिसांचे आमिष दाखवून क्विक स्टार्ट २४ ग्रुप कंपनीने ठेवीदारांना गंडवले आहे. या प्रकरणात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सेवानिवृत्त उपअभियंता सरताजसिंग चहल यांनी तक्रार दिल्यानंतर घोटाळा समोर आला होता. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कंपनीची व्यवस्थापक शीतल सुधाकर मोतिंगे, विठ्ठल भागाजी तांदळे यांना अटक केली आहे. कंपनीचे संचालक शहा, गांधीच्या शोधासाठी सहायक पोलीस निरीक्षक मोहसीन सय्यद यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांचे पथक सोमवारी अहमदाबादला गेले होते. त्‍यांनी अहमदाबादमधील कार्यालय गाठले. मात्र, तेथे आता दुसरेच कार्यालय आहे. दोघांनी सहा महिन्यांपूर्वीच जागा सोडल्याचे कळाले. घरातील सदस्यही दुसरीकडे स्थायिक झाले. ते राहत असलेले घरदेखील भाडेतत्त्वावरचे असल्याचे कळाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी : ६ लाखांचा गांजा साठा जप्त, तस्कराच्या मुसक्या आवळल्या, साथीदार फरारी

Latest News

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी : ६ लाखांचा गांजा साठा जप्त, तस्कराच्या मुसक्या आवळल्या, साथीदार फरारी सातारा पोलिसांची मोठी कामगिरी : ६ लाखांचा गांजा साठा जप्त, तस्कराच्या मुसक्या आवळल्या, साथीदार फरारी
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा गाव आणि पैठण तालुक्‍यातील गेवराई बुद्रूकमध्ये सातारा पोलिसांनी मोठी कारवाई करत...
तरुणीने दोन दिवसांपूर्वी मोबाइल घेतला, कामावरून घरी येताना दुचाकीस्वाराने हिसकावून ठोकली धूम!, एएस क्लबजवळील घटना
महत्त्वाची बातमी : छ. संभाजीनगरात ‘म्हाडा’ सोडत अर्ज भरण्यास ८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
छ. संभाजीनगर जिल्ह्यातील शाळांत आता रोज एक तास खेळासाठी; जिल्हाधिकारी स्वामी यांची घोषणा
शेजाऱ्याच्या छतावर बसवलेल्या मोबाईल टॉवरमुळे तुमचे आरोग्य धोक्यात! रेडिएशन किती?, कुठे कराल तक्रार?
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software