कपिलचे चारही मारेकरी पोलिसांच्या ताब्‍यात!; यश फत्तेलष्करने गेम केला, मोठे कारण आले समोर, वाळूज MIDC तील थरारपट उलगडला…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रांजणगाव शेणपुंजी येथील रहिवासी हॉटेलचालक कपिल सुदाम पिंगळे (वय ३३, रा. देवगिरी कॉलनी) याच्या हत्‍येप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. जयेश उर्फ यश संजय फत्तेलष्कर (वय २४, रा. बेगमपुरा), विकास सुरेश जाधव (वय १९, रा. रामनगर, जालना), सागर उर्फ जितसिंग विलास मुळे (वय २३, रा. शनी मंदिराजवळ, जालना) […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रांजणगाव शेणपुंजी येथील रहिवासी हॉटेलचालक कपिल सुदाम पिंगळे (वय ३३, रा. देवगिरी कॉलनी) याच्या हत्‍येप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. जयेश उर्फ यश संजय फत्तेलष्कर (वय २४, रा. बेगमपुरा), विकास सुरेश जाधव (वय १९, रा. रामनगर, जालना), सागर उर्फ जितसिंग विलास मुळे (वय २३, रा. शनी मंदिराजवळ, जालना) आणि भरत किसन पंडुरे (वय ३३, रा. बेगमपुरा) अशी अटक केलेल्यांची नावे असून, आपल्याला जीवे मारण्याची सुपारी कपिलने घेतल्याचा संशय यशला होता. याच संशयातून यशने साथीदारांसोबत मिळून कपिलचा गेम केला. चौघांना न्यायालयात हजर केले असता २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.जी. गुणारी यांनी दिले.

गोळ्या झाडून ३३ वर्षीय युवकाची हत्‍या करण्यात आल्याची घटना वाळूज एमआयडीसीतील वडगाव कोल्हाटीत शुक्रवारी (१९ जुलै) पहाटे समोर आली होती. साईबाबा चौकात कपिलचा मृतदेह आढळला होता. खुन्याने पाठीत घातलेली गोळी छातीतून बाहेर निघाली होती. कपिल मूळचा नांदेड जिल्ह्यातील कारेगावचा (ता. धर्माबाद) आहे. कपिलचे वडील रोजगारासाठी वाळूज एमआयडीसीत येऊन पुढे रांजणगाव शेणपुंजीत स्थायिक झाले होते. कपिलचे लॉज- हॉटेल आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात असायचा.

वर्चस्ववादातून त्‍यांचे स्थानिकांशी खटके उडत असल्याने या हत्‍येला राजकीय किनार असल्याची चर्चा होती. मात्र वर्चस्ववादातून सुपारी घेतल्याचा संशय यशला होता. त्‍यातून कपिल आपल्याला संपवेल, त्याआधी त्‍यानेच कपिलला संपवले. या प्रकरणात कपिलचे वडील सुदाम पिंपळे यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, कपिलची हॉटेल काही दिवसांपासून बंद आहे. कपिलला यशने गुरुवारी रात्री भेटायला बोलावले. कपिलसोबत यश व त्‍याच्‍या ३ मित्रांनी एका हॉटेलमध्ये जेवण केले. मध्यरात्री कपिलला घरी सोडण्याचा बहाणा करून रांजणगावच्या दिशेने कारमधून सारे निघाले. कारमध्ये सुपारी दिल्याच्या कारणावरून यशने कपिलसोबत वाद सुरू केला.

विकासने कपिलला मारहाण केली. यशने त्‍याच्‍याजवळ असलेल्या गावठी पिस्‍तुलाने कपिलच्या खांद्याजवळ गोळी झाडली, तर सागने चाकूने कपिलवर १७ वार केले. मोठा रक्‍तस्‍त्राव होऊन कपिल कारमध्येच निपचित पडला. तो मरण पावल्याची खात्री झाल्यावर चौघांनी वडगाव कोल्हाटीच्या खदानीजवळ मृतदेह टाकून दिला. कपिल व यश दोघेही गुन्हेगार होते. पूर्वी चांगले मित्र होते. काही दिवसांपासून दोघांत खटके उडत होते. आपल्याला जीवे मारण्याची सुपारी कपिलने दिल्याचा संशय यशला होता. यातून आपल्याला त्‍याने मारण्याआधी त्‍यालाच आपण संपवू, असा कट यशने रचला. त्‍यासाठी त्‍याने मित्र विकास, सागर, भरत यांना सोबतीला घेतले. चौघांनाही जालन्‍यातून अटक करण्यात आली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली

Latest News

कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली
मुंबई (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की पुरेसे उत्पन्न असलेली नोकरी करणारी पत्नी हिंदू विवाह...
विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
पडेगावमध्ये मनपा ड्रेनेजलाइनच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना, मातीचा ढिगारा अंगावर कोसळून तरुणाचा मृत्यू
सिल्लोडच्या या गावात सुरू होते सेक्स रॅकेट, पोलिसांनी छापा मारून युवतीची केली सुटका!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software