चिकलठाणाऐवजी लवकरच ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’‌ !, तयारी झाली, पण घोडे कुठे अडले ?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केंद्र सरकारने चिकलठाणा विमानतळाचे छत्रपती संभाजीनगर विमानतळ असे नामकरण करण्याचे परिपत्रक काढले आहे. मात्र छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण हवे, अशी मागणी होत असल्याने नामकरणाची पुढील प्रक्रिया भारतीय विमानतळ प्राधिकरणाने थांबविली आहे. लवकरच नामकरणाचे सुधारित परिपत्रक निघणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे झाल्यानंतर शासकीय कार्यालये, विभाग आणि संस्थांची नावेही बदली. काही दिवसांपूर्वीच रेल्वे स्टेशनचे नामकरणही छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन असे झाले. मात्र विमानतळ मात्र चिकलठाणा नावानेच आहे. विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करावे, अशी मागणी आहे. यापूर्वी केंद्र सरकारने छत्रपती संभाजीनगर विमानतळ या नामकरणाचे परिपत्रक काढले होते. त्यादृष्टीने पुढील हालचालीही सुरू झाल्या. मात्र छत्रपती संभाजीनगर विमानतळ ऐवजी छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नाव करावे, अशी मागणी सुरू झाल्याने नामकरणाची प्रक्रिया थांबली आणि आता विमानतळ प्राधिकरणाला केंद्र सरकारच्या सुधारित परिपत्राची प्रतीक्षा आहे. खा. डॉ. भागवत कराड याबद्दल म्हणाले, की लवकरच छत्रपती संभाजी महाराज विमानतळ नामकरणाचे परिपत्रक निघेल. मात्र नामकरणाच्या दृष्टीने सर्व तयारी करण्यात आली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 

Latest News

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना  पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...
शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना
कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software