‘सिपेट’तर्फे विनामूल्य प्लास्टिक प्रोसेसिंग अभ्यासक्रम; इच्छुकांकडून अर्ज मागविले

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भारत सरकारच्या पेट्रो रसायन अभियांत्रिकी व प्रौद्योगिकी संस्था (सिपेट) यांच्या वतीने प्लास्टीक प्रोसेसिंग मशिन ऑपरेटर हा चार महिने कालावधीचा विनामूल्य अभ्यासक्रम राबविण्यात येतो. या अभ्यासक्रमास इच्छुकांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जाचा नमुना www.cipet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

हा अभ्यासक्रम पूर्णतः निःशुल्क असून राज्यातील रहिवासी असलेल्या १८ ते ३० वर्षे वयोगटातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, आर्थिक मागासलेल्या गटातील युवक, युवतींसाठी हा चार महिने कालावधीचा अभ्यासक्रम विनामूल्य आहे. या अभ्यासक्रमाच्या ५५ जागा असून १० वी उत्तीर्ण किंवा त्याच क्षेत्रातील अनुभव असलेल्या इयत्ता ८ वी पर्यंत शिक्षण झालेले उमेदवारही अर्ज करु शकतील. अधिक माहिती व अर्जाचा नमुना www.cipet.gov.in या संकेतस्थळावर आहे. प्रवेश प्रक्रिया २४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. अधिक माहितीसाठी ९३२५६८७९१०/ ९६०१३६४५५०/९१४५६७५५८५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन व्यवस्थापक सिपेट, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 

Latest News

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना  पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...
शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना
कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software