वाळूज MIDC तील ‘एफडीसी’ लिमिटेडच्या कामगारांना १८,५०० रुपयांची भरघोस वेतनवाढ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील एफडीसी लिमिटेड कंपनीच्या कामगारांना १८ हजार ५०० रुपयांची भरघोस वेतनवाढ कंपनी व्यवस्थापनाने मंजूर केली आहे. कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांत गुरुवारी (११ डिसेंबर) बैठक झाली होती. बैठकीतील करारानुसार वेतनवाढ मंजूर झाल्याची माहिती मिळताच कामगारांनी कंपनीत आनंदोत्सव साजरा केला. गुलाल उधळून व कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

एफडीसी ही औषधनिर्मिती कंपनी असून, कंपनीत ६८ कायमस्वरुपी कामगार कार्यरत आहेत. गुरुवारच्या बैठकीला कंपनी व्यवस्थापनाकडून मानव संसाधन विभागाचे झफरुल्लाह खान, महाव्यवस्थापक जीवन टिकेकर, व्यवस्थापक सचिन कुलकर्णी, मानव संसाधन विभागाचे विवेक जोशी, रोशन भुरवणे तर कामगार संघटनेकडून अध्यक्ष डी. के. गायकवाड, विनायक गरड, रामनाथ खेडकर, ज्ञानेश्वर खोमणे, दिलीप वाणी, नवनाथ चव्हाण यांची उपस्थिती होती. बैठकीत एकूण १८ हजार ५०० रुपयांच्या वेतनवाढीसह दिवाळी बोनस म्हणून ३६ हजार रुपये, निवृत्तीवेळी एका महिन्याचे एकूण वेतन, सेवा गौरव पुरस्कार, क्रीडा सहाय्यासाठी ८० हजार रुपये, आपत्कालीन व्याजमुक्त कर्ज ७० हजार रुपये, दोन लाख रुपयांची वैद्यकीय विमा योजना, प्रवास भत्ता (एलटीए) २ हजार ८०० रुपये, समूह वैयक्तिक अपघात विमा संरक्षण आठ लाख रुपये, बेनिव्होलेंट निधी २० हजार रुपये आदी महत्त्वाचे लाभ पॅकेज मंजूर करण्यात आले आहे. दरम्यान, कंपनी व्यवस्थापनाने ही वेतनवाढ थकबाकीसह १ नोव्हेंबरपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण असून संघटना व व्यवस्थापनातील समन्वयाचे उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software