‘सीएमआयए’च्या अध्यक्षपदी अर्पित सावे; नूतन कार्यकारिणी जाहीर

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (सीएमआयएच्या) अध्यक्षपदी अर्पित सावे, मानद सचिवपदी अथर्वेशराज नंदावत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मोठ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून मराठवाड्याचा विकास करण्यावर आणि स्थानिक उद्योगांना जागतिक स्तरापर्यंत नेण्यावर भर देऊ. मराठवाड्याला एक भरभराटीचे औद्योगिक केंद्र, असा विश्वास यावेळी नूतन अध्यक्ष अर्पित सावे यांनी व्यक्‍त केला. ‘सीएमआयए’ २०२४-२५ […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (सीएमआयएच्या) अध्यक्षपदी अर्पित सावे, मानद सचिवपदी अथर्वेशराज नंदावत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मोठ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून मराठवाड्याचा विकास करण्यावर आणि स्थानिक उद्योगांना जागतिक स्तरापर्यंत नेण्यावर भर देऊ. मराठवाड्याला एक भरभराटीचे औद्योगिक केंद्र, असा विश्वास यावेळी नूतन अध्यक्ष अर्पित सावे यांनी व्यक्‍त केला.

‘सीएमआयए’ २०२४-२५ वर्षाच्या कार्यकारिणीची शनिवारी (६ जुलै) घोषणा करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी उत्सव माछर, सहसचिव स्मिता भारतीया, मानद कोषाध्यक्ष मिहीर सौंदलगेकर, सहकोषाध्यक्ष अनुज बन्सल, प्रशासन जनसंपर्क सेल प्रमुखपदी सौरभ छल्लानी, महिला समिती प्रमुख उत्कर्षा पाटील, उद्योग-व्यापार समितीप्रमुख ऋषिकेश जाजू, कौशल्य विकास समिती प्रमुख अंकित काळे, वाळूज झोन प्रमुख जितेंद्र संघवी, ऑरिक झोन प्रमुख ऋषिकेश गवळी आणि मराठवाड्यातील अन्य उद्योग वसाहत झोन प्रमुख रसदीपसिंग चावला यांची एकमताने निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीने शनिवारी पदभार स्वीकारला. मावळते अध्यक्ष दुष्यंत पाटील, माजी अध्यक्ष आशिष गर्दे, प्रसाद कोकीळ, गुरप्रीतसिंह बग्गा, पॅट्रोन सदस्य रितेश मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती होती. निवडणूक समितीत अध्यक्ष म्हणून मुनिश शर्मा, सदस्य म्हणून आशिष गर्दे, गुरप्रीतसिंह बग्गा यांनी काम पाहिले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...
खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
'वाईट कमेंट वाचून त्यांना फटकारावेसे वाटत होते...; अभिनेत्री नेहा धुपियाची विशेष मुलाखत
Business News : भाजी विक्रेत्याने जिंकली ११ कोटींची पंजाब राज्य लॉटरी, त्याला किती उत्पन्न कर भरावा लागेल?
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software