रॅडिको दुर्घटना : औद्योगिक सुरक्षा विभागाला कंपनीने फाट्यावर मारले, गुन्हा दाखल झालेले संशयितही जामिनावर

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील रॅडिको या मद्यनिर्मिती कंपनीत १५ नोव्हेंबरला पत्र्याची टाकी फुटून त्‍यातील मकाखाली दबून ४ कामगारांचे बळी गेले. या भीषण दुर्घटनेला कंपनी व्यवस्थापन दोषी असल्याचेही समोर आले, गुन्हेही दाखल झाले. यानंतर औद्योगिक सुरक्षा विभागाने कंपनीला दोन नोटिसा पाठवून त्यांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कंपनीने या नोटिसांना […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील रॅडिको या मद्यनिर्मिती कंपनीत १५ नोव्हेंबरला पत्र्याची टाकी फुटून त्‍यातील मकाखाली दबून ४ कामगारांचे बळी गेले. या भीषण दुर्घटनेला कंपनी व्यवस्थापन दोषी असल्याचेही समोर आले, गुन्हेही दाखल झाले. यानंतर औद्योगिक सुरक्षा विभागाने कंपनीला दोन नोटिसा पाठवून त्यांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कंपनीने या नोटिसांना केराची टोपली दाखवली. आता कंपनीविरोधात पुढील कारवाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची तयारी अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे.

रॅडिको कंपनीतील दुर्घनेची चौकशी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक धीरज खिरोडकर यांच्या पथकाने केली. चौकशीत कंपनी व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा समोर आला. त्‍यामुळे कंपनीवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी खिरोडकर यांनी दोनदा नोटीस बजावून तुमचे म्हणणे सात दिवसांत सादर करा, असे निर्देश कंपनीला दिले होते. मात्र, या नोटिसांना कंपनीने फारसे सिरियस घेतलेले दिसत नाही.त्‍यामुळे पुढील चार दिवस कंपनीच्या उत्तराची प्रतीक्षा केली जाणार आहे. त्यानंतर कंपनीवरील पुढील कारवाईचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात येणार आहे. या कारवाईला शासनाकडून परवानगी मिळताच कंपनीविरोधात न्यायालयात खटला भरण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्‍यान, दुर्घटनेला जबाबदार धरून करमाड पोलिसांनी कंपनीचे सहायक व्यवस्थापक सुरेंद्र खैरनार, महादेव पाटील आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर ज्ञानेश्वर रिठे यांच्याविरुद्ध गुन्हा केला होता. सर्व संशयितांना उच्च न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 

Latest News

पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना  पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलिसांत माझ्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत टवाळखोराने साथीदारांसोबत मिळून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी...
शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना
कंडोम पॅकिंग मशीन देण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा!; वाळूज MIDC तील घटना
जाधववाडीतील व्यापाऱ्याची दुकानातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या!
ब्रिजवाडीतील जमीन घोटाळ्याची होणार CID चौकशी!;  महसूल मंत्र्यांची घोषणा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software