नाव मोठं लक्षण खोटं… पार्श्वनाथ बिल्डरला दणका; सुविधांचे आमिष भोवले, फ्‍लॅटधारकांची फसवणूक केल्याबद्दल ग्राहका मंचाने ठोठावला दंड

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील पार्श्वनाथ बिल्डरचे नाव मोठं असलं तरी लक्षण खोटं असल्याचं समोर आलं आहे. सुविधांचे आमिष दाखवून प्रत्‍यक्षात फ्‍लॅटधारकांना ठेंगा दाखवला. त्‍यामुळे ग्राहक मंचाने या बिल्डरचे कान उपटत दंड ठोठावला आहे. गारखेड्यातील एनआरबी रेन्बो पॅलेसिया गृहप्रकल्पात ॲम्फी थिएटर, चिल्ड्रन पार्क, जॉगिंग ट्रॅक, स्टडी रूम, खुल्या जागेसह अनेक सुविधांचे आमिष पार्श्वनाथ बिल्डरने […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील पार्श्वनाथ बिल्डरचे नाव मोठं असलं तरी लक्षण खोटं असल्याचं समोर आलं आहे. सुविधांचे आमिष दाखवून प्रत्‍यक्षात फ्‍लॅटधारकांना ठेंगा दाखवला. त्‍यामुळे ग्राहक मंचाने या बिल्डरचे कान उपटत दंड ठोठावला आहे.

गारखेड्यातील एनआरबी रेन्बो पॅलेसिया गृहप्रकल्पात ॲम्फी थिएटर, चिल्ड्रन पार्क, जॉगिंग ट्रॅक, स्टडी रूम, खुल्या जागेसह अनेक सुविधांचे आमिष पार्श्वनाथ बिल्डरने दाखवून तेथील फ्लॅटची २७ लाखांत विक्री केली होती. प्रत्यक्षात कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत. त्‍यामुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने पार्श्वनाथ बिल्डरला सेवेत त्रुटी आणि अयोग्य व्यापार प्रथेचा अवलंब केल्याप्रकरणी ५० हजार रुपये कॉस्टसह अनुचित व्यापार पद्धतीसाठी १० हजार तर फ्लॅटधारकाचा मानसिक छळ केल्याप्रकरणी ५ हजार रुपये देण्याचा आदेश दिला आहे.

पार्श्वनाथ बिल्डरची पळपुटेपणा…
पार्श्वनाथ बिल्डरला वेळोवेळी नोटीस पाठवूनही सुनावणीला त्‍यांच्याकडून कुणीही हजर राहिले नाही. गारखेडा परिसरात २०१९ मध्ये बालाजी शेटलवार यांनी टू बीएचके फ्लॅट २७ लाख रुपयांत खरेदी केला होता. बिल्डरने करारातील नमूद सुविधा दिल्या नाहीत, अशी तक्रार त्‍यांनी ग्राहक मंचात केली होती. जिल्हा ग्राहक तक्रार आयोगाच्या अध्यक्षा शिल्पा डोल्हारकर, सदस्य गणेशकुमार सेलूकर व जान्हवी भिडे यांनी सहा महिन्यांत सर्व सेवा- सुविधा पुरविण्याचे आदेश पार्श्वनाथ बिल्डरला दिले आहेत. सर्व सुविधांची पूर्तता न केल्यास ५० हजार कॉस्ट पुन्हा भरावी लागेल, असेही आदेशात म्‍हटले आहे.

आमिषे इतकी की…
पार्श्वनाथ बिल्डर केवळ आमिषे दाखविण्यासाठी प्रसिद्ध असून, प्रत्‍यक्षात कोणत्याही सुविधा पुरवत नसल्याचे समोर आले. सुविधांमध्ये ॲम्फी थिएटर, चिल्ड्रन पार्क, स्टडी रूम, खुली जागा, सुरक्षा भिंत, लोखंडी दरवाजा देण्याचे कबूल केले होते. यापैकी एकही सेवा-सुविधा दिली नाही. पाण्याची बोअरवेल बसवून दिली जाईल, सुरक्षा रक्षक असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते. प्रत्‍यक्षात काहीच दिले नाही. परिसरात कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात आलेले नाही. फ्‍लॅटही गळत आहे. प्रकल्पातील घरांमधील गळती त्वरित रोखण्यात यावी, पाण्याची टाकी दुरुस्त करून द्यावी, असेही आदेशात म्हटले आहे. यासंदर्भातील वृत्त आजच्या अंकात एका प्रसिद्ध दैनिकाने दिले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...

Latest News

दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले... दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर येथे सोमवारी (२ मार्च) सायंकाळी होळी पूजन झाले. त्यानंतर...
प्रेयसीचे लग्न मोडले, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल, साखरपुडा उरकल्यानंतर नियोजित वराला इन्स्टाग्रामवर आले फोटो...,गंगापूरमधील धक्कादायक प्रकार
छत्रपती संभाजीनगरजवळ बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन?; उत्खननाची खोली पोहोचली २६ मीटरपर्यंत, २४ तास ४० हून अधिक गाड्या सुरू...
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
हिंदू मुलीची धर्मांधाच्या ताब्यातून ४८ तासांत सुटका!; पैठणहून केले होते अपहरण, नवी मुंबईत आवळल्या मुसक्या!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software