छत्रपती संभाजीनगरहून गोव्यासाठी पहिले विमान झेपावले!; असे आहे वेळापत्रक…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरहून गोव्यासाठी आता थेट विमान उपलब्‍ध झाले आहे. इंडिगो कंपनी आठवड्यातून तीन दिवस मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी ७८ प्रवासी क्षमतेचे विमान सुरू केले आहे. लखनऊ-नागपूर-छत्रपती संभाजीनगर-गोवा अशी ही विमानसेवा असणार आहे. आज, २ जुलैला शुभारंभाच्या पहिल्याच विमानाने शहरातील पर्यटन आणि उद्योजक सकाळी ११ ला विमानात बसले. ते दुपारी दीडला […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरहून गोव्यासाठी आता थेट विमान उपलब्‍ध झाले आहे. इंडिगो कंपनी आठवड्यातून तीन दिवस मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी ७८ प्रवासी क्षमतेचे विमान सुरू केले आहे.

लखनऊ-नागपूर-छत्रपती संभाजीनगर-गोवा अशी ही विमानसेवा असणार आहे. आज, २ जुलैला शुभारंभाच्या पहिल्याच विमानाने शहरातील पर्यटन आणि उद्योजक सकाळी ११ ला विमानात बसले. ते दुपारी दीडला गोव्यात पोहोचतील. परतीसाठी गोवा येथून दुपारी २.१० वाजता हेच विमान असून, सायंकाळी ४.१० वाजता चिकलठाणा विमानतळावर पोहोचेल. आठवड्यातून तीन दिवस शहरवासीयांना नागपूर, लखनऊसह गोव्याला जाण्याची सोय यामुळे उपलब्‍ध झाली आहे. सध्या शहरातील चिकलठाणा विमानतळावरून नवी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू आहे. आता गोवा आणि नागपूरसाठीही विमानसेवा सुरू झाली आहे.

असे आहे वेळापत्रक…
लखनऊहून सकाळी ७.३० वाजता निघून नागपूरला सकाळी ९.२० वा. पोहोचेल. नागपूरहून संभाजीनगरसाठी सकाळी ९.४० वा. निघून सकाळी ११ वा. छत्रपती संभाजीनगरला पोहोचेल. छत्रपती संभाजीनगरहून सकाळी ११.३० वा. निघून गोवा येथे दुपारी १.३० वा. पोहोचणार. गोवा येथून दुपारी २.१० वाजता छत्रपती संभाजीनगरसाठी रवाना आणि दुपारी ४.१० वा. शहरात पोहोचणार. छत्रपती संभाजीनगर येथून सायं. ४.४० वा. निघून नागपूर येथे सायं. ६.१० वा. पोहोचणार. नागपूरहून रात्री ६.३० वाजता लखनऊसाठी रवाना होईल आणि रात्री ८.१५ वा. पोहोचणार.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना

Latest News

धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना धक्कादायक : पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, मछली खडक भागातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लग्नानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यानेच घरातील ९ लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील...
३८ वर्षीय महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, वाळूज MIDC तील घटना
तलावात पोहताना दोन मुलांचा बुडून मृत्यू, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दुर्घटना
करमाडजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : ट्रकने ५ कामगारांना उडवले, तिघांचा जागीच मृत्‍यू, २ गंभीर
वाळूज MIDC तील ठाकरे गटाच्या आंदोलनाला हिंसक वळण!; सोनवणेंना अक्षरशः ढकलत पोलिसांनी गाडीत बसवले, संतप्त नागरिकांनी मडके पोलिसांवर फेकले, हजार-दीड हजार लोकांचा पोलीस ठाण्याला घेराव
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software