छ. संभाजीनगरात पतीपासून विभक्‍त राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीवर वकिलाचा वारंवार बलात्‍कार!, दोनदा प्रेग्‍नंट केले अन्‌ गर्भपातही करवला!!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पतीपासून विभक्‍त राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीसोबत वकिलाने लग्नाचे आमिष दाखवत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तिला दोनदा प्रेग्‍नंट केले अन्‌ गर्भपात करवला. रविवारपासून (३ ऑगस्ट) लग्‍नाला नकार देत संपर्कच बंद केल्याने तरुणीने सिडको पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्‍यावरून ॲड. महेंद्र भगवान नैनाव (रा. एन ६, सिडको) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार तरुणीला सहा वर्षांचा मुलगा आहे. मात्र पतीसोबत पटत नसल्याने ती वेगळी राहते. कौटुंबिक न्यायालयात त्‍यांची केस सुरू आहे. तक्रारीनुसार, संशयित महेंद्र तिचा स्‍कूलमेट असून, ८ मार्च २०२५ रोजी पाचोरा येथील न्यायालयात दोघांची कामादरम्यान भेट झाली. शाळेतल्या आठवणी ताज्या झाल्या. पुन्हा मैत्री बहरली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. महेंद्र तिला टीव्ही सेंटरसह शहरातील वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये नेऊन शारीरिक संबंध ठेवू लागला. यातून ती प्रेग्नंट राहिली.

त्‍याने प्रेमाची शपथ देऊन गर्भपात करवला. नंतर तुझे एलएलबीचे शिक्षण करतो. तू माझ्यासोबत राहा. आपण रूम करून राहू, असे म्हणून तिला तो १२ जूनला शहरात घेऊन आला होता. त्यानंतर दोघे जयभवानीनगरमध्ये एकत्र राहू लागले. यातून ती दुसऱ्यांदा प्रेग्नंट राहिली. महेंद्रने तिचा पुन्हा गर्भपात करवला. तरुणीने लग्नाचा विषय काढला की तो बँकेत सेव्हिंग करून सेटल होऊ दे. नंतर लग्न करू, असे म्हणून टाळाटाळ करायचा.

ती आजारी असतानाही शरीरसंबंध ठेवण्यासाठी तिला मारहाण करत होता. तरुणीने लग्नाचा हट्ट सुरूच ठेवल्याने दोघांत वाद सुरू झाले. मी हायकोर्टात वकील आहे. सगळे मॅनेज करू शकतो, असे तो तिला धमकावत होता. तिच्या सोशल मिडिया खात्यांचे पासवर्ड स्वतःकडे ठेवून त्यावर लक्ष ठेवायचा. रविवारी (३ ऑगस्ट) तो तिला गाडीने उडवण्याची धमकी देऊन निघून गेला आणि त्‍याने तिच्याशी संपर्क बंद केला आहे. तिचे कॉल घेणेही त्याने बंद केले. त्यानंतर तरुणीने सिडको पोलीस ठाण्यात धाव घेतली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे...

Latest News

हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे... हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : थार गाडीला बेल्ट बांधून एटीएम यंत्र थेट उखडून नेण्याचा प्रयत्‍न फसला. मध्येच बेल्ट तुटला अन्‌...
कृषी खात्‍यातील वरिष्ठ लिपिकाची गोदापात्रात उडी घेऊन आत्‍महत्‍या, चार महिन्यांपूर्वी झाले होते लग्‍न, गंगापूर तालुक्‍यातील धक्कादायक घटना
लाचखोर तलाठी अक्षय बिनीवाले, कोतवाल सोमनाथ कोल्हे ACB च्या जाळ्यात!, पैठण तहसील कार्यालयात कारवाई
हे असे आंदोलन योग्य आहे? : वसतिगृहात आक्षेपार्ह वस्तू सापडल्या, त्‍यामुळे रात्रीची तपासणी, काही विद्यार्थी रात्री एक-दोनला येतात, त्‍यामुळे १० नंतर नो एंट्री!; विधी विद्यापीठ झाले सक्‍त, पण रूचली नाही ‘शिस्त’!!'; विद्यार्थ्यांचे आंदोलन
छ. संभाजीनगरात पतीपासून विभक्‍त राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीवर वकिलाचा वारंवार बलात्‍कार!, दोनदा प्रेग्‍नंट केले अन्‌ गर्भपातही करवला!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software